Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतुन मुक्तता

उड्डाण पूलाचे काम ८४ टक्के पूर्ण लवकरच खा.श्रीकांत शिंदे करणार पाहणी

कल्याण प्रतिनिधी - मध्यमवर्गीयांचे सुरक्षित वास्तव्याचे ठिकाण म्हणून डोंबिवली शहराला मोठ्या प्रमाणावर पसंती दिले जात आल्याने, या शहराचे नागरि

सार्वजनिक बांधकाम विभाग झाला भ्रष्टाचाराचा अड्डा l पहा LokNews24
वीज यंत्रणेवरील स्थानिक कर आकारणीतून महावितरणला सूट
मुख्यमंत्र्यांना चेष्टा-मस्करी करण्याची सवय… नाना पटोलेंची मिश्किल प्रतिक्रिया

कल्याण प्रतिनिधी – मध्यमवर्गीयांचे सुरक्षित वास्तव्याचे ठिकाण म्हणून डोंबिवली शहराला मोठ्या प्रमाणावर पसंती दिले जात आल्याने, या शहराचे नागरिकरण झपाट्याने होत आहे. डोंबिवली शहरात प्रत्येक घरा मागे सरासरी दोन ते तीन दुचाकी व चारचाकी वाहने असल्याने पर्यायाने वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत असून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. डोंबिवली शहरातील नागरिकांना आपल्या वाहनाने ठाणे मुंबई ,नवी मुंबई व पनवेल ला जाण्यासाठी शिलफाटा व कल्याणहून भिवंडी मार्गे ये जा करावे लागत असल्याने या रस्त्यावरील वाहनाच्या लांबच लांब रांगांच्या वाहतूक कोंडीतून तासंतास खोळंबून राहावे लागत आहे. डोंबिवली शहरातून ठाणे मुंबईकडे जाण्यासाठी जोड रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने व शासनाच्या एमएमआरडीए च्या माध्यमातून मोठा गाव ते कोपर रस्त्यासाठी १८ कोटी, मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या रिंग रोडच्या तिस:या टप्प्याकरीता ५७० कोटीची निविदा मंजूर केली आहे. रेल्वे फाटकाच्या पुलाचे काम सुरु झाले आहे.सध्या या पूलाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले असून . लवकरच खासदार श्रीकांत शिंदे याची पाहणी करून  हा पूल वाहतूकीसाठी येत्या एप्रिल महिन्यापासून खुला केला जाईल अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

COMMENTS