Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा !

स्वाधार योजनेसाठी 60 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध, लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार!

केज प्रतिनिधी - राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेड

मोठा अपघात ! विमानाच्या चाकाखाली आली कार अन्….
अंत्यसंस्कारानंतर दहा दिवसांनी परतला तरुण!
माझी लायकी काढण्याइतकी रामदास कदमांची लायकी नाही

केज प्रतिनिधी – राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे  यांच्या पुढाकाराने व आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागास 60 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सदर प्राप्त झालेला 60 कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. तसेच स्वाधार योजनेच्या अटी व नियमांमध्ये बदल होऊन सुधारणा होण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना व सामाजिक संघटना यांच्याकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने  समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार समिती गठित करण्यात आली होती. राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांच्याशी याबाबत विविध बैठका करून याबाबत सुधारणा करायच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील विविध विद्यार्थी संघटना यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांच्या समवेत चर्चा व बैठक करून याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 1 ते 13 मुद्द्यांबाबत सुधारणा करण्याच्या शिफारशी आयुक्त कार्यालयाने नुकत्याच शासनास सादर केलेल्या आहे. स्वाधार योजनेच्या अटी, शर्ती व त्या अनुषंगाने काही बदल येणार्‍या काळात होणार आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुलभता निर्माण होणार आहे व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक गतिमान पद्धतीने व वेळेत देणे सोयीचे होणार आहे. राज्यात समाज कल्याण विभागामार्फत 441 शासकीय वसतिगृह कार्यरत असुन त्यामध्ये 50 हजार विद्यार्थींची शिक्षणाची सोय झाली आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे . राज्यात विभागीय, जिल्हा व तालुका याप्रमाणे विविध स्तरावर विद्यार्थ्यांना रुपये 60 हजार ते 48 हजार रुपये वार्षिक त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात .यापूर्वी शासनाने नुकतेच  सदर योजनेसाठी रुपये 15 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता,  तसेच दि 12 मे 2023 रोजी रुपये 60 कोटींचा निधी ऑनलाईन प्रणालीवर आयुक्तालयास उपलब्ध झाला आहे. समाज कल्याण विभागाने सामाजिक न्याय पर्व तसेच योजनांची जत्रा या शासनाच्या विशेष अभियानांतर्गत राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त व सबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी स्वाधार योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणावर तपासुन मंजूर केले असून प्राप्त झालेल्या निधीमुळे आता मंजूर अर्ज निकाली निघणार आहेत. समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी देखील पुणे येथे सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून 24 तास कार्यालय सुरू ठेवून मोठ्या प्रमाणावर अर्ज निकाली काढले होते. आता रुपये 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाने मार्गी लावला आहे.

COMMENTS