Homeताज्या बातम्यादेश

रिलायन्स गुजरातचीच कंपनी राहील

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे वक्तव्य

अहमदाबाद ः गुजरातील असल्याचा आपल्याला अभिमान असून, रिलायन्स इंड्रस्ट्रीज ही कायम गुजराती कंपनी होती आणि यापुढेही राहिल असे वक्तव्य रिलायन्स इंडस्

अभिनेता माधवनच्या मुलाची भरारी
कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या
राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय 60 होणार

अहमदाबाद ः गुजरातील असल्याचा आपल्याला अभिमान असून, रिलायन्स इंड्रस्ट्रीज ही कायम गुजराती कंपनी होती आणि यापुढेही राहिल असे वक्तव्य रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले असून, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये सध्या दहावी व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद सुरू आहे. ‘गेटवे टू द फ्युचर’ ही यंदाच्या परिषदेची थीम आहे. या परिषदेला अंबानी यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली. तसेच, गुजरातच्या वेगवान विकासाचेही कौतुक केले. ’गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार आहे. रिलायन्सने भारतात 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्यापैकी एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये आहे. 2024 च्या शेवटी रिलायन्स गुजरातमध्ये गिगा कारखाना सुरू करेल, अशी घोषणाही त्यांनी केली. ’2030 पर्यंत गुजरातला लागणार्‍या एकूण उर्जेची निम्मी गरज अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू. यासाठी आम्ही जामनगरमध्ये 5 हजार एकरवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील आणि हरित उत्पादनांचे उत्पादन शक्य होईल आणि गुजरात हरित उत्पादनांचा अग्रेसर निर्यातदार होईल. आम्ही 2024 च्या शेवटी-शेवटी हा गीगा प्रकल्प सुरू होईल. गुजरातमध्ये सर्वत्र 5जी नेटवर्क गेले आहे. यामुळे गुजरात डिजिटल डेटा प्लॅटफॉर्म आणि एआय स्वीकारण्यात जगात आघाडीवर असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात समिटचे कौतुक केले. ही परिषद जागतिक पातळीवरील सर्वात प्रतिष्ठित गुंतवणूकदार परिषद म्हणून ओळखली जाऊ लागली आहे, असे ते म्हणाले. 2047 पर्यंत गुजरात 3000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. 2047 पर्यंत भारताला 35000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असेही ते म्हणाले.

COMMENTS