Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 घरांसाठी 5 डिसेंबरला सोडत

मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या 5863 घरांच्या विक

ब्रम्हलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराजांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न 
‘त्या’ तीन महिलेचा खून करून जाळलं | DAINIK LOKMNTHAN
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा

मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या 5863 घरांच्या विक्रीसाठी 24 नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र आता ही सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता पुणे मंडळाने सोडतीची नवी तारीख जाहीर केली असून आता 5 डिसेंबर रोजी पुण्यात सोडत काढण्यात येणार आहे.
या सोडतीत अंदाजे 59 हजार अर्जदार सहभागी होणार आहेत. पुणे मंडळ क्षेत्रातील 5863 घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला इच्छुकांनी बर्‍यापैकी प्रतिसाद दिला आहे. अर्जविक्री-स्वीकृतीच्या अंतिम मुदतीत 60 हजार अर्ज दाखल झाले आहेत. यातील अंदाजे 59 अर्जदार पात्र ठरले आहेत. सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार 24 नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र काही प्रशासकीय कारणाने ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा लांबली आहे. पण आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. आता 5 डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही सोडत काढण्याचे नियोजन असून यासाठी अजित पवार यांची वेळ घेण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS