नाशिक प्रतिनिधी - वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट, नासिक या संस्थेने यंदाच्या दिवाळीअंका मध्ये वैभवशाली प्राचीन लिपी दिवाळी अंक २ या अंकाचे प्रक
नाशिक प्रतिनिधी – वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट, नासिक या संस्थेने यंदाच्या दिवाळीअंका मध्ये वैभवशाली प्राचीन लिपी दिवाळी अंक २ या अंकाचे प्रकाशन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर समवेत श्री. लक्ष्मण साताळकर, डॉ. अविश फलोड, श्री. राजाराम जाधव, श्री. चंदन घुगे, श्री. वाघ व आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.
वैभवशाली प्राचीन लिपी दिवाळी अंक १ सन २०२१ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. ज्यात ब्राम्ही, खरोष्टी, शारदा, ग्रंथ, मोडी, नेवारी, फारसी या लिपीमधील दिवाळी या सणावर आधारित दिवसांवर लेख प्रकाशित करण्यात आले होते. या अंकाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. या वर्षी याच अंकाची तिसरी आवृत्तीसुद्धा प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व दिवाळी अंकाचे संपादक श्री. सोज्वळ साळी (पुरातत्त्वज्ञ, प्राचीन लिपी तज्ज्ञ व प्राचीन पट-खेळ संवर्धक) यांनी सांगितली.
वैभवशाली प्राचीन लिपी दिवाळी अंक २ यावर्षी प्रकाशित करण्यात आले असून यामध्ये जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील वस्तू व त्याबद्दलची माहिती- श्री. बापूजी ताम्हाणे, जुन्नर (पुणे) प्राचीन पटखेळ; प्राचीन जगाच्या इतिहासाचे साक्षीदार – श्री. सोज्वळ साळी (नासिक), नासिकमधील तोडकरवाडा एक पुरातन वस्तूंचे वारसायन – डॉ. संध्या व श्री. राजेंद्र तोडकर (नासिक), लेख छोटा पण संदेश मोठा – डॉ. भाग्यश्री पाटसकर (पुणे), वैभवशाली प्राचीन लिपी – मोडी लिपी – श्री. सोज्वळ साळी (नासिक), वाई परिसरातील प्राचीन भित्तिचित्रे – श्री. आदित्य माधव चौंडे (वाई, सातारा) हे लेख या एकाच अंकामध्ये बघायला मिळणार आहे. दिवाळी अंकाची संकल्पना सोज्वळ शैलेंद्र साळी यांची असून प्रकाशक वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट वतीने करण्यात आले शैलेंद्र पांडुरंग साळी , यांचे प्रमुख मार्गदर्शन होते सदर अंक यशस्वी करण्यासाठी सौ लता साळी, श्री सुभाष गांधी, विलास कडू, अनिरुद्ध चौरे, कु. स्नेहल बने आदी प्रयत्नशील होते.
COMMENTS