Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुुंबई महापालिकेतील जाहिरातीतील जाचक अटी शिथील करा

आदित्य ठाकरेंची मागणी ः दहावी आणि पदवीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट

मुंबई :  मुंबई महानगरपालिकेतील पूर्वीचे लिपीक आणि आताचे कार्यकारी सहायक या पदाच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये असण

राज्यात दुष्काळ सदृश्य आणि मंत्री मात्र अदृश्य
धर्माचा विवेक शाबूत ठेवा !
रायगडावरील विविध कामांसाठी बैठक घेणार

मुंबई :  मुंबई महानगरपालिकेतील पूर्वीचे लिपीक आणि आताचे कार्यकारी सहायक या पदाच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये असणार्‍या जाचक अटी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या जाचक अटीमुळे अनेक उमेदवार अर्ज भरू शकणार नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने नुकतीच 1846 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेने कार्यकारी सहायक या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांनी दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या  मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे, उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे  दोन  ते तीन लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्जच भरता येणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिकतर्फे कार्यकारी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.  या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्ण असणे ही जाचक अट घातली आहे. या कारणास्तव महाराष्ट्रातील दोन ते तीन लाख मुला-मुलींना परीक्षेचा अर्ज ही भरता येणार नाही व त्यांच्यासाठी ही अट अन्यायकारक आहे. सध्या महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भयावह प्रश्‍न पाहता आपण कृपया या अटीच्या पुनरावलोकनासाठी योग्य ती कारवाई करावी व या अटीत बदल करावा. जेणेकरून अधिकाधिक योग्य आणि सक्षम उमेदवारांना या पदासाठी संधी मिळेल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.    मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 सप्टेंबरपर्यंत आहे. 

COMMENTS