Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परिवारातील नाते भावनांच्या धाग्याने बांधले तर कधीच तुटणार नाहीत – प.पू.डॉ.गौरवमुनी

माजलगाव प्रतिनिधी - आपल्या परिवारातील गोष्टी बाहेर कोणालाही सांगू नये. परिवारातील कोणाचाही द्वेष करू नये. परिवारातील व्यक्तींसोबत नाते संबंध तोडण

कुलगुरू निवडीवरून राज्यपाल-ठाकरे सरकारचा पुन्हा संघर्ष
स्मशानभूमीत पार पडला आगळा वेगळा विवाह सोहळा
मतांसाठीच भारतरत्न देण्याचा डाव

माजलगाव प्रतिनिधी – आपल्या परिवारातील गोष्टी बाहेर कोणालाही सांगू नये. परिवारातील कोणाचाही द्वेष करू नये. परिवारातील व्यक्तींसोबत नाते संबंध तोडण्याचे मनात कधीही भाव आणू नये अथवा घरातल्या लोकांसोबत भेदभाव कधी करू नये. आपल्या परिवारातील नाते भावनांच्या धाग्याने बांधले तर कधीच तुटणार नाहीत पण जर स्वार्थाच्या नात्याने बांधले तर नाते टिकणार नाही असे उद्बोधन प.पू.डॉ.गौरवमुनी म.सा. यांनी चातुर्मास निमित्त आयोजित प्रवचनमालेत केले.
दि.23 जुलै रविवार रोजी ’परिवार म्हणजे काय’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते पुढे बोलताना म्हणाले की, परिवारात राहत असताना दूध आणि पाण्यासारखे रहा कारण दुधात किती पाणी आहे हे कोणीच ओळखू शकत नाही परंतु जर तेल आणि पाण्यासारखे राहिलात तर पाण्यावर तेल तरंगते म्हणून बाहेरच्या लोकांना लगेच ओळखायला येईल यांच्या परिवारात किती मतभेद आहेत. परिवारात राहत असताना आपल्या परिवारातील सदस्याचा राग जरी आला तरी त्यांच्याशी अबोला नका धरू. चांगल्या परिवाराच्या यशस्वीतेसाठी परिवारातील सदस्यांचे विचार व्यवस्थितपणे ऐकून घेणे, सर्वांना समजून घेणे, सर्वांना सन्मान देणे, व सर्व गोष्टींचा स्विकार करणे हे चार मुद्दे महत्त्वाचे आहेत. अशाच सर्व रीतीने व सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प.पू.डॉ.गौरवमुनी म.सा. यांनी समाज बांधवांना आपल्या व्याख्यानातून प्रबोधन केले. यावेळी सर्व समाजबांधव आपापल्या परिवारासमवेत बसून या व्याख्यानाच्या माध्यमातून शिकवण घेत होते.

COMMENTS