नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा भरघोस मतांनी विजय झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहर कोण असेल? यावर चर्चा सुरू होती. मात्र हा पेच बुध

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा भरघोस मतांनी विजय झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहर कोण असेल? यावर चर्चा सुरू होती. मात्र हा पेच बुधवारी निकाली निघाला असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुचविलेल्या रेखा गुप्ता यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केल्यानंतर गुरूवारी रामलीला मैदानावर शालीमार बाग येथील भाजप आमदार रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत.
या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थिती होते. रेखा गुप्तासह उपमुख्यमंत्री परवेश शर्मा आणि 6 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीचे नायब राज्यपाल एलजी विनयकुमार यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. दिल्ली विधानसभेत 27 वर्षानंतर सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळाले आहे.रेखा गुप्ता यांच्यासोबत 6 मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. यामध्ये प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रवींद्र इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांचा समावेश आहे. देशाच्या राजधानीत 27 वर्षानंतर भाजपचे कमळ खुलले असून गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू होती. त्यामुळे, दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाची माळ नेमकं कोणाच्या गळ्यात पडणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. नेहमीप्रमाणे भाजपने दिल्लीसाठी देखील धक्कातंत्र वापरत रेखा गुप्ता यांना भाजप आमदारांचा गटनेता म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर, गुरूवारी सकाळी त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री
यापूर्वी, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी भाजपच्या सुषमा स्वराज, काँगे्रसच्या शीला दीक्षित आणि आपच्या आतिशी यांनी महिला म्हणून कार्यभार सांभाळला होता. आता, रेखा गुप्त यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून शालीमार विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या तीनवेळा आमदार राहिलेल्या बंदना कुमारी यांचा पराभव करत त्या दिल्लीच्या प्रमुख पदावर विराजमान झाल्या आहेत.
COMMENTS