मुंबई: खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या
मुंबई: खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलिस चौकशी करत आहेत.
COMMENTS