Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोफत मधुमक्षिका पालन प्रशिक्षणासाठी नावनोंदणी सुरु

नाशिक (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात सात दिवसीय निवासी मोफत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक

कोल्हापूर, सातार्‍याला मुळसाधार पावसाचा फटका
सण-उत्सव पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा : मंत्री जयकुमार रावल
Displaying मधुमक्षिका पालन फोटो.jpeg

नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात सात दिवसीय निवासी मोफत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम येत्या दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरासाठी इच्छुक शेतकरी व युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत आयोजित या शिबिरात महाराष्ट्रातील नामांकित तज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यात मधुमक्षिकांचे विविध प्रकार आणि वैशिष्ट्ये, पालन कौशल्ये, संगोपन व संवर्धन, परागीभवन व कृषी उत्पादन वाढीसाठीची भूमिका, मध संकलन व प्रक्रिया, विपणन व व्यवसाय संधी आदींचा समावेश असणार आहे. प्रात्यक्षिकात मधुमक्षिकांच्या वसाहतींची मांडणी, वसाहतींचे विभाजन, पेट्यांची रचना व पोळे बांधणी, रोग नियंत्रणासाठी वसाहतीची साफसफाई, जलद परागीभवनासाठी शेतात व बागेत मधुमक्षिकांच्या वसाहतींची मांडणी करणे, मध काढणी व प्रक्रिया इत्यादी बाबींचे मार्गदर्शन केले जाईल. इच्छुक शेतकरी व युवक-युवतींनी या प्रशिक्षणाच्या अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी श्री. ऋषिकेश पवार यांच्याशी ७३८५२७२४०९ या भ्रमणध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले आहे. 

COMMENTS