Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झेंडा कोणाचाही असो, नेतृत्व गुजर समाजच करणार

पाली पंचायत समिती गणात गुजर समाजाचा एल्गारबीड । प्रतिनिधीपाली पंचायत समिती गणामध्ये गुजर समाजाची सामाजिक व राजकीय ताकद भक्कम असून, यापूर्वीही पंचा

बीड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी
धार्मिक स्थळांसाठी ध्वनिक्षेपक परवाना अनिवार्य; केजमधील मंदिरांनी घेतला पुढाकार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संसदरत्न खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पाली पंचायत समिती गणात गुजर समाजाचा एल्गार
बीड । प्रतिनिधी
पाली पंचायत समिती गणामध्ये गुजर समाजाची सामाजिक व राजकीय ताकद भक्कम असून, यापूर्वीही पंचायत समिती सदस्य गुजर समाजाचाच राहिलेला आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत जो राजकीय पक्ष गुजर समाजाला बरोबर घेईल आणि पंचायत समिती सदस्य गुजर समाजाचा असेल, त्या पक्षाच्या पाठीमागे गुजर समाज भक्कमपणे उभा राहणार असल्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे.
आतापर्यंत गुजर समाजातील कार्यकर्ते सर्वच राजकीय पक्षांसोबत निष्ठेने काम करत होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर समाजाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता हे थांबवण्याचा निर्णय समाजाने घेतला आहे. आता राजकीय पक्षांची हुजरेगिरी नाही, तर समाजाची एकजूट आणि स्वतःचे नेतृत्व या भूमिकेवर समाज ठाम असल्याचे आवाहन अखिल भारतीय गुजर देवसेनेचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी केले. गुजर समाज मुठभर नसून ढीगभर असून, देशभर पसरलेला आहे. समाजाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष भीमसिंह गुजर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत गुजर पाटील (नाशिक) यांच्यासह समाजातील मंत्री, आमदार व खासदार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. समाजासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा संकल्प या नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष रतन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील गुजर यांनी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार जाहीर केला. शिरूर तालुक्यातील एक, पाटोदा तालुक्यातील एक, बीड तालुक्यातील लिंबागणेश गणातील एक तसेच पाली गणातील एक अशा एकूण चार पंचायत समिती गणांमधून उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी नाकारली, तर अपक्ष उमेदवार उभा करण्याचा ठाम निर्णय समाजाने घेतला आहे. सध्या प्रत्येक गणामधून इच्छुकांची मोठी गर्दी असून, तळागाळातील सर्व समाजबांधवांची संयुक्त बैठक घेऊन सर्वानुमते एक उमेदवार निश्चित केला जाणार आहे. त्या उमेदवाराच्या पाठीमागे समाज तन-मन-धनाने उभा राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सर्व समाजबांधवांचा आशीर्वाद घेऊन हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले जाणार असून, आता समाज थांबणार नाही असे ठाम वचन जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी यावेळी दिले.

COMMENTS