Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मान्सून पूर्वतयारीबाबत आ. काळे आज घेणार आढावा बैठक

कोपरगाव : हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी चांगले पर्जन्यमान  होण्याचे संकेत देण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना नैसर्गिक संकटाम

जागर स्त्री शक्तीचा नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता
आमदार काळेंच्या पुढाकारातून कोपरगावची बाजारपेठ फुलणार
दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी झाल्याचे समाधान

कोपरगाव : हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी चांगले पर्जन्यमान  होण्याचे संकेत देण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना नैसर्गिक संकटामुळे पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नये यासाठी प्रशासनाने कोपरगाव मतदार संघात केलेल्या मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आ.आशुतोष काळे बुधवार (दि.29) रोजी दुपारी 2.00 वा. तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.
यावर्षी मान्सूनचे लवकरच आगमन होणार आहे. पावसाळ्यात वादळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणार्‍या अडचणी संदर्भात प्रशासनाने केलेली तयारी याबाबत आ.आशुतोष काळे आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीसाठी महसूल, कृषी, महावितरण, आरोग्य विभाग, वन विभाग तसेच इतरही प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडून मान्सून पूर्व तयारीचा आढावा आ.आशुतोष काळे जाणून घेणार आहेत. परंतु त्याव्यतिरिक्त नागरिकांना प्रशासनाकडून अपेक्षित असलेली तयारी तसेच मतदार संघातील ज्या-ज्या गावात किंवा कोपरगाव शहरात नागरिकांना पावसाळयात संभाव्य अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अडचणी मांडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने मतदार संघातील नागरिकांना करण्यात आले आहे.

COMMENTS