Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतीमा राजकीय पुढार्‍याच्या फोटो खाली ठेवून आमच्या भावणा दुखावल्या बद्दल-सिरसाळा पोलिस स्टेशनला निवेदन

सिरसाळा प्रतिनिधी - दि. 14 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात सोसायटी पदाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सा

लव्ह जिहादचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी ऑनलाइन व्याख्यान
दुहेरी हत्याकांड: बापलेकाची निर्घुण हत्या | LOKNews24
दीपाली सय्यद यांची माजी स्वीय सहायकाविरोधात पोलिसात तक्रार

सिरसाळा प्रतिनिधी – दि. 14 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात सोसायटी पदाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो राजकिय पुढा-याच्या फोटो खाली ठेवला आहे. हि बाब चुकीची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महामानव आहेत. त्यांची जयंती अथवा इतर कार्यक्रम साजरे करतांना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी संबंधितांनी घ्यायला पाहीजे होती परंतू अस न कराता सिरसाळा सेवा सहकारी सोसायटीत जयंती साजरी करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा एका राजकिय पुढा-याच्या फोटो खाली ठेवून अमचे दैवत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतीमेचा अपमाण झाला आहे. हि खुप गंभीर बाब आहे. या मुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. ह्या प्रकरणी सिरसाळा सेवा सोसायटी पद अधिकार्‍यांचा निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला आहे.यावेळी ऑल इंडीया प्यांथर  युवा मराठवाडा अध्यक्ष अशोक घडवे, वंचीत बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष विजय झिंजुर्डे, सामाजिक कार्यकर्ते विकास चोपडे, धर्मा मेंडके,भुषण उजगरे, नंदू शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS