शेतकरी, लाडकी बहीण आणि पायाभूत सोयी-सुविधांना वाहिलेला अर्थसंकल्प महायुतीच्या सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर के

शेतकरी, लाडकी बहीण आणि पायाभूत सोयी-सुविधांना वाहिलेला अर्थसंकल्प महायुतीच्या सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केला. खरंतर महायुती सरकारकडून दुसर्या टर्मचा पहिलाच पूर्णकालीक अर्थसंकल्प सादर करत महायुती सरकार विकासाच्या वाटेवर असल्याचे अधोरेखित केले आहे. या अर्थसंकल्पातुून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासाचे प्रतिबिंब दिसून येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 351 कोटींचा निधी, यासोबतच कृषी क्षेत्रासाठी एआय धोरण राबविण्यात येण्याची घोषणा करन शेतकर्यांना देखील हायटेक बनवणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. तसेच 5000 हजार कोटींचे अपूर्ण सिंचन कोटीचे काम पूर्णत्वास नेणार असल्याची ग्वाही या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, लाडकी बहीण आणि पायाभूत सोयी-सुविधांसह रस्ते विकासाला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे दिसून येत आहे.
खरंतर महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून, विचाराने आणि आचाराने देखील प्रगत राज्य आहे. या राज्यात पायाभूत सोयी-सुविधांसाठी मोठी तरतूद जशी करण्यात आली आहे, त्याचप्रकारे शेतकरी आणि लाडक्या बहिणींना देखील झुकते माप देण्यात आले आहेत. शेतकरी आणि लाडक्या बहिणी राज्याचा कणा आहे. विकासचे रथ आहे, त्यांना डावलून कोणतीही बाब पूर्णत्वास जावू शकत नाही, याची जाणीव सत्ताधार्यांना असल्यामुळेच या अर्थसंकल्पांत महिलांसाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबईसाठी 64,787 हजार कोटींचे प्रकल्प मुंबईत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे विकासाच्या केंद्रस्थानी मुंबई असे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तसेच पुणे-शिरूर असा 54 किमीचा उन्नत महामार्ग होणार असून त्यासाठी 7 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रस्ते पुन्हा एकदा वेगवान होणार असून, सर्वसामान्यांचा प्रवास सहज आणि सोपा होणार आहे. त्यामुळे विकासाला मोठ्या प्रमाणावर गती मिळणार आहे. समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा लवकरच सुरू होणार असून शक्तीपीठ महामार्गाला देखील सुरवात होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधांसह रस्त्यांचा मोठा विकास महायुती सरकारच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.
कोणत्याही राज्यात पायाभूत सोयी-सुविधा जर भक्कमपणे असतील तर राज्याचा विकास होण्यास वेळ लागत नाही, त्याच दिशेने पुन्हा एकदा राज्याने पावले टाकण्यास सुरूवात केले आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी आपला 11 वा अर्थसंकल्प काल विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा पायाभूत सोयी-सुविधांचा विकासासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूदी करण्यात आल्या आहेत. लॉजिस्टिक धोरण, तसेच वाढवण बंदराचा विकास, यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अजित पवारांनी अधोरेखित करण्यात आले आहेत. वाढवण बंदरच्या माध्यमातून महाराष्ट्र देशाचे बंदर हब होणार आहे. तसेच वाढवण बंदराजवळच नवे विमानतळ उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदराला समुद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असल्याची घोषणा देखील अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे रोजगार आणि दळणवळणाच्या सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. यासोबत राज्यात वीजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील, वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून राज्याचा विकास करण्यात येणार आहे. नव्या पिढीला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 250 एकरवर नाविन्यता सिटी विकसित करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच राज्यात सात ठिकाणी व्यापारी केंद्र उभे करणार असून, महाराष्ट्रात 10 हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परकीय गुंतवणुकीतून 16 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला. देशाच्या निर्यातीमध्ये पंधरा टक्के वाटा हा महाराष्ट्राचा असल्याचे ते म्हणाले. एमएमआर क्षेत्र ग्रोथ सेंटर म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केला आहे.राज्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे रोजगारात वाढ होत असल्याचा दावा अजित पवार यांनी केले आहे. औद्योगिक विकासात महाराष्ट्र अव्वल असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्य प्रगतीच्या शिखरावर जाणार असल्याची आपल्याला खात्री असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे, या विकसित भारतात योगदान देण्यासाठी महाराष्ट्र अव्वल कामगिरी करेल असा आशावाद अजित पवारांनी व्यक्त केला. खरंतर महाराष्ट्र राज्य हे परकीय गुंतवणुकीत अव्वल राहिले आहे. राज्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत असून उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर राज्यात येत आहे, त्यातून रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे.
COMMENTS