Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दाऊदचा साथीदार डोला सलीम विरोधात रेड कॉर्नर नोटीस

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार डोला सलीम आणि त्याच्या मुलाविरोधात मुंबई पोलिस लवकरच रेड कॉर्नर नोटीस जारी करणार आहेत. कारण हे

पाथर्डी व शेवगावांतील पिकांचे पंचनामे करावेत
रवी राणा यांनी बच्चू कडूंच्या मतदारसंघातच एन्ट्री करत किराणा वाटप केला
आधी रक्तदान करा, त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार डोला सलीम आणि त्याच्या मुलाविरोधात मुंबई पोलिस लवकरच रेड कॉर्नर नोटीस जारी करणार आहेत. कारण हे दोघेही एका वर्षात 1000 कोटी रुपयांच्या ड्रग्जचा व्यापार करतात. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनेक जवळच्या साथीदारांवर कारवाई केली आहे. आता डोला सलीम आणि त्याच्या मुलावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
दाऊदचा जवळचा सहकारी डोला सलीम आणि त्याचा मुलगा ताहिर डोला यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध लुक आऊट सर्कुलर जारी केले आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एक महत्त्वाचा व्यक्ती या ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली आहे. दाऊद इब्राहिमचा खास गुंड सलीम सध्या दुबईत बसून दाऊदचा ड्रग्ज व्यवहार पाहत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  तो कधी दुबईत तर कधी तुर्कीमध्ये फिरत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. डोला सलीम लोकांना दाखवण्यासाठी रिअल इस्टेटचे काम करतो पण त्याचा खरा व्यवसाय ड्रग्जचा आहे. ड्रग्जच्या व्यवसायात डोला सलीमचा मुलगा ताहीर डोलाही त्याला मदत करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळेच गुन्हे शाखेने त्यालाही या प्रकरणात आरोपी केले आहे. आता पोलिस लवकरच या कामात असलेल्या पिता-पुत्राच्या विरोधात रेड कॉर्नर दाखल करणार आहेत. अंडरवर्ल्डच्या इशार्‍यावर नोटीस जारी केली जाणार आहे. एका अधिकार्‍याने सांगितले की, डोला सलीम हा दाऊदच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. तो त्याच्यासाठी भारतात ड्रग्जचा व्यापार पाहतो. यापूर्वी डोला सलीमला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने तत्कालीन आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सांताक्रूझ परिसरात टाकलेल्या छाप्यात अटक केली होती. 100 किलो फेंटॅनाइल ड्रग्ज जप्त केले होते. 1000 कोटी जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी डोला सलीमला रंगेहात अटक केली होती. त्यात डोलाला जामीन मिळाला आणि जामीन मिळताच तो नेपाळमार्गे पळून जाऊन लपण्यासाठी दुबईला गेला होता. आता त्याने तिथून दाऊदसाठी ड्रग्जचा धंदा सुरू केला आहे. 

COMMENTS