गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात आज सायंकाळ पासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण

गोंदिया प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात आज सायंकाळ पासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काल जिल्ह्याचा तापमान ४२ अंशापर्यंत पोहचला होता. मात्र आज सायंकाळ पासून सुरु झालेल्या अवकाळी पावसाने आता वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काही तालुक्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. मात्र या पावसाने साथीचे रोग मात्र आपले पाय पसरवणारा हे मात्र नक्की.
COMMENTS