नाशिक - आकांक्षित तालुका कार्यक्रम हा देशाच्या सर्वात दुर्लक्षित आणि मागासलेल्या तालुक्यांमध्ये सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र स

नाशिक – आकांक्षित तालुका कार्यक्रम हा देशाच्या सर्वात दुर्लक्षित आणि मागासलेल्या तालुक्यांमध्ये सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत देशभरातील ५०० तालुक्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याचाही समावेश करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी ‘आकांक्षित तालुका फेलो’ या एका पदासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने एक प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर फेलो पदाचा कार्यकाळ एक वर्षाचा असून तालुका विकास आराखडा राबवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करणे, सर्व भागधारकांमध्ये समन्वय ठेवणे इत्यादी काम करण्याची जबाबदारी त्यांची असेल.
सदर पदासाठी अर्ज भरणे, वस्तुनिष्ठ परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत भरती प्रक्रिया होणार असून, दि. २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
सदर पदासाठीचे निकष आणि विस्तृत जाहिरात zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
https://forms.gle/D1A2bCfBdgQhtqrL7 या लिंकवर उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS