Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 75 हजार पदांची भरती रेंगाळणार !

टीसीएस आणि आयबीपीएस कंपन्यांकडे मर्यादित केंद्र नोकर भरतीबाबत समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात कोरोनामुळे नोकर भरती रखडली होती, मात्र राज्य सरकारने स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती करण्याची

राहीबाई पोपेरे यांची बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट
चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न
संभाजी ब्रिगेडचे 22 ऑगस्टला मुंबईत अधिवेशन

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात कोरोनामुळे नोकर भरती रखडली होती, मात्र राज्य सरकारने स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती करण्याची घोषणा केली होती. नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित सेंटर असल्यामुळे परीक्षा देणार्‍या उमेदवारांची संख्या वाढल्यास त्याचे नियोजन करण्यासाठी या कंपन्या असमर्थ ठरत असल्यामुळे 75 हजार भरती रेंगाळण्याची शक्यता दिसून येत आहे.

राज्य सरकार यावर तोडगा काढण्यासाठी नोकर भरतीबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती दोन दिवसांत निर्णय घेणार आहे. एवढी मोठी नोकरभरती राबविण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर समिती काम करणार असून, नोकर भरतीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. राज्य सरकारने नोकर भरती घेण्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मात्र भंडारा जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी या दोन्ही कंपन्यांचे सेंटर नाहीत. त्यामुळे परीक्षा घ्यायच्या कसा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या भरतीसाठी राज्यभरातून जवळपास 15 लाख उमेदवार अर्ज करण्याची क्षमता मात्र दोन्हीही कंपन्यांची एवढी क्षमता नाही. टीसीएस कंपनी एकावेळी राज्यात 7500 ते 8000 पर्यंत उमेदवारांची परीक्षा घेऊ शकते तर आयबीपीएस कंपनी दहा हजार ते पंधरा हजार एका वेळी एका शिफ्टमध्ये परीक्षा घेऊ शकतात. त्यामुळे या कंपन्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त अर्ज आले तर परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सदस्य सचिव जिल्हा निवड समिती भंडारा यांनी ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून माहिती दिली आहे. त्यामुळे 75 हजार नोकर भरती रेंगाळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या 75 हजार नोकर भरती पुन्हा रेंगाळण्याची शक्यता आहे. कारण एकाच वेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या दोन्ही नियुक्त कंपन्या एकाच वेळी परीक्षा घेण्यास असमर्थ असल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार पदांच्या भरतीच्या वेगाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी केंद्रांची संख्या अपुरी   – राज्यात 75 हजार नोकरभरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे यासंदर्भात संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्‍न आहे.  जिल्हा निवड समिती भंडारा यांनी आक्षेप घेतल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. नोकरभरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारने टिसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परीक्षा सेंटर आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात यावर निर्णय होणार आहे.

COMMENTS