Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयात रेकॉर्ड ब्रेक ओपीडीत 1353 रुग्ण नोंद

साडेपाचशे लॅब रिपोर्ट, सव्वा दोनशे रुग्ण ऍडमिट तर चौतीस रुग्णांचे ऑपरेशन

बीड प्रतिनिधी - बीड जिल्हा रुग्णालयात सर्वात जास्त रुग्ण नातेवाईकांची  गर्दी पाहायला मिळते मात्र  जिल्हा रुग्णालयाच्या ओ पी डी विभागात 1353 रुग्

इलेक्ट्रॉल बाॅंड बंदी : एक वस्तुस्थिती !
कर्जत, जामखेड तालुक्याच्या आरोग्य विषयक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल – आरोग्य मंत्री राजेश टोपे
तब्बल अठरा तासानंतर सांगली बाजार समिती परिसरातील गवा पकडला

बीड प्रतिनिधी – बीड जिल्हा रुग्णालयात सर्वात जास्त रुग्ण नातेवाईकांची  गर्दी पाहायला मिळते मात्र  जिल्हा रुग्णालयाच्या ओ पी डी विभागात 1353 रुग्ण तपासणीसाठी आल्याचे  रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली. गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य डॉक्टर सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णातील सर्व डॉक्टर, कर्मचारी, आरोग्य सेवक, रुग्णांच्या रुग्णसेवेसाठी काम करताना दिसून येत आहेत. जिल्हा रुग्णालयात  वेगवेगळ्या अत्याधुनिक साहित्य सामग्रीच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी केली. उदा. इंडॉस्कॉपी  दुर्बीण, टू डी इको, अशा माध्यमातून तपासणी केली जाते. त्यामूळे कोणत्या रुग्णाला कोणता आजार आहे हे तपासण्यासाठी रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डत व विभागात सोय केलेली आहे. जिल्हा रुग्णालयात  सध्या प्रत्येक रुग्णावर योग्य असे उपचार केले जात आहे. अतिशय अवघड व महागड्या शस्त्रक्रिया ( ऑपरेशन) या विभागात योग्य रित्या पार पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे रुग्ण नातेवाईकांचा विश्वास  जिल्हा रुग्णालयावर निर्माण झाला आहे त्यामुळे गोरगरीब रुग्णावर उपचार होत आहे.

 बीड जिल्हा रुग्णालयात काल दिवसभरात 1353 रुग्ण तपासणीसाठी आले. ओपीडी विभागात  स्त्रिया632 तर पुरुष 721 रुग्णांची नोंद झाली. त्यातील रुग्ण ऍडमिट 214 झाले. डिलिव्हरी वार्डात 37 महिला  डिलिव्हरी झाल्या त्यातील 13 सिजर झाले. शस्त्रक्रिया विभागात एकूण 34 शस्त्रक्रिया झाल्या. सोनोग्राफी विभागात 207 रुग्णांची सोनोग्राफी करण्यात आली. रक्त तपासणी विभागात एच आय व्ही विभाग, गरोदर महिलांची रक्त चाचणी  विभाग सह लॅब मध्ये 542 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. तर एक्स-रे विभागात 160 रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले. सिटीस्कॅन 15 रुग्णांचे  झाले तसेच लसीकरण विभागांमध्ये 120 लहान बालकांना डोस देण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली  अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण, आर एम ओ.  डॉ. राम आव्हाड, जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य आधिसेविका रमा गिरी,डॉ. संतोष  शहाणे, फिजिशियन  डॉ.संजय राऊत, सर्जन डॉ. माजेद सर, सर्जन डॉ.प्रदीप वाघमारे, डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. सचिन देशमुख, स्त्री रोग तज्ञ डॉ. किरण शिंदे, बालरोग तज्ञ डॉ.रविकांत चौधरी यांच्यासह सर्व भाग प्रमुख व आरोग्य सेवक कर्मचारी यांचं टीम वर्क जिल्हा रुग्णालयाच खरोखरच अभिमानास्पद आहे. गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा रुग्णालयावर विश्वास ठेवत रूमला रुग्ण आडमिट होताना दिसून येत आहेत. कारण जिल्हा रुग्णालयात अति अल्प  दरात सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एक्स-रे, डायलेसिस, व रुग्णा च्या वेगवेगळ्या रक्त तपासण्या केल्या जातात. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात  वयोवृद्ध रुग्णांसाठी कुठलाही रुपया घेतला जात नाही त्यामुळे जिल्हा रुग्णालावर  विश्वास ठेवून रुग्णा उपचार घेताना दिसून येत आहेत. जिल्हा रुग्णातील प्रत्येक रुग्णांची काळजी घेण्यासाठी डॉक्टर सुरेश साबळे हे रात्रंदिवस सर्व टीम वर्क वर  लक्ष ठेवून आहेत. आज दिवसभरात जिल्हा रुग्णालयात तीस हजार रुपयाची रक्कम ही जिल्हा रुग्णालयाच्या  तिजोरीत जमा झाली.

COMMENTS