Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंडखोरांनी माझा फोटो वापरू नये

खा. शरद पवारांची सक्त ताकीद

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष अणि पक्षाचे चिन्ह घडयाळ यावरच आप

अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच ठरणार
शरद पवारांचे आता मिशन गोंदिया
आमचे लक्ष उद्याची विधानसभा निवडणुकीवरच

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष अणि पक्षाचे चिन्ह घडयाळ यावरच आपण आगामी निवडणूका लढणार असल्याचे सांगत पक्ष अणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. शिवाय आमच्या पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार असून, त्यांचा फोटो वापरण्याचे आवाहन केले होते. यावर राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पलटवार करतांना हटले आहे की, माझ्या जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा, कुणी वापरू नये, हा माझा सर्वस्वी अधिकार असून, बंडखोरानी माझा फोटो कुठेही वापरू नये अशी सक्त ताकीदच त्यांनी यावेळी दिली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे 35 हून अधिक आमदार पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंड करून राज्यातील भाजपप्रणित सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. आमचाच पक्ष खरा राष्ट्रवादी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचवेळी शरद पवार हेच आमचे नेते आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांकडून शरद पवार यांचा फोटोही वापरला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी इशारा दिला आहे. माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत, त्यांनी माझा फोटो वापरू नये. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हे ठरविण्याचा मला अधिकार आहे, असे त्यांनी ठणकावले आहे. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि जयंत पाटील हे ज्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्या पक्षाने व त्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनीच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये, असे त्यांनी बजावले आहे. पक्षाच्या दिल्ली कार्यालयाची जबाबदारी सोनिया दुहान यांच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाची जबाबदारी सोनिया दुहान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शरद पवार यांनी स्वत: तसे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीचा शरद पवारांना पाठिंबा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधार्‍यांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराची कार्यकारणी बैठक पार पडली. यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीस येऊन त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यापुढील काळातही शरद पवार यांच्यासोबत राहतील असा निर्धार व्यक्त केल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. यावेळी व्यासपीठावर खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS