Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसचे आमदार झिशान सिद्दीकींचे बंड

राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये लवकरच प्रवेश करणार ?

मुंबई ः विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी काँगे्रसचे आमदार झिशान सिद्दीकी रडारवर असतांनाच, त्यांनी सोमवारी उघड पक्षाविरोधात बंड प

निपाणी-निमगाव ते वाटापूर रस्त्याच्या कामाला सुरूवात
स्वातंत्र्यदिनी मुळा धरण तिरंगा छटांनी भिजले
आज १४ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मुंबई ः विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी काँगे्रसचे आमदार झिशान सिद्दीकी रडारवर असतांनाच, त्यांनी सोमवारी उघड पक्षाविरोधात बंड पुकारत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाल्याने ते लवकरच राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता बळावली आहे.
झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती. झिशान सिद्दीकी यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही मात्र ते उघडपणे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होत आहेत त्यामुळे लवकरच ते राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहेत. वांद्रे ते अणुशक्तीनगर या भागातून अजित पवारांची जनसन्मान यात्रा काढण्यात येत आहे. या मतदारसंघात झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर्स लावले आहेत. अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिकांनीही अजितदादांच्या स्वागताचे बॅनर्स लावले आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघात 15 हजाराहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आहे. याच महिन्यात त्यांना 3 हजार मिळाले आहेत. त्यासाठीच आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद देण्यासाठी वांद्रे पूर्व येथील जनता रस्त्यावर उतरत आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. ते महायुतीचे असले म्हणून काय झाले. जे चांगले काम करतात त्यांचे कौतुक व्हायला हवं. मी सध्या काँग्रेससोबत आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात काही दिवसांपासून न्याय यात्रा वर्षा गायकवाडांनी काढली होती त्यात मला बोलावण्यात आले नाही. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागवले जात आहेत. मी माझा प्रतिनिधी पाठवला मात्र त्याला अर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे काँग्रेसचा निर्णय समजला, आता आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आमच्यासाठी जनता निर्णय घेईल. काँग्रेस नेतृत्व जर त्यांच्या पक्षातील आमदारांसोबत उभे राहत असते तर त्यांना इतर नेतृत्वाकडे जाण्याची वेळ आली नसती अशी नाराजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी बोलून दाखवली.

COMMENTS