Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

अकोले ः तालुक्यातील कोतूळ येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोतुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात

३ हजार ९०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या योजनांच्या सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाख निधीची तरतूद: मंत्री शंकरराव गडाख
नगर मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवून अवजड वाहतूक बंद करा
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरास भेट

अकोले ः तालुक्यातील कोतूळ येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोतुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी थोर शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
15 ऑकटोबर 2023 रोजी माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती यांच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये हा दिवस वाचन प्रेरणा दिवस साजरा होत आहे. राज्याच्या सर्व शाळांमध्ये हा दिवस वाचन प्रेरणा दिवस साजरा करून, राज्याच्या शाळा आणि कॉलेजांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. एपीजे अब्दुल कलाम यांचे देशासाठी मोठे योगदान असल्याचे यावेळी भाजपचे युवा नेते राजेंद्र पाटील देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख इंजिनिअर सुभाष देशमुख पत्रकार सुनील गीते ग्रामपंचायत कर्मचारी जालिंदर वाकचौरे होमगार्ड साळवे आदी उपस्थित होते.

COMMENTS