कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करताना स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी स्वत:च्या शिक्

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करताना स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी स्वत:च्या शिक्षण संस्था उभ्या न करता फक्त आणि फक्त रयत शिक्षण संस्थेच्या हिताला प्राधान्य देवून निस्वार्थ भावनेतून रयत शिक्षण संस्थेला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवले आहे. तोच वसा आणि वारसा पुढे चालविण्यासाठी उत्तर विभागाची जबाबदारी जेव्हापासून आमदार आशुतोष काळे यांच्याकडे दिली तेव्हापासून ते समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांच्या माध्यमातून सहा वर्षात रयतच्या उत्तर विभागाने दैदिप्यमान कामगिरी केली असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य एम.टी.रोहमारे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मागील सहा वर्षात आ. काळे उत्तर विभागाची जबाबदारी सांभाळत असताना भौतिक सुविधा निर्माण करताना प्रचंड मोठ्या प्रमाणात शाळा-महाविद्यालयांच्या अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधांयुक्त इमारती बांधल्या आहेत. विभागात गुणवत्ता कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत सहा वर्ष उत्तर विभाग सर्व विभागात गुणवत्तेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर राहिला आहे. स्पर्धा परीक्षेतील उल्लेखनीय यशाबद्दल यावर्षी उत्तर विभागाला डॉ.एन.डी.पाटील आदर्श विभाग पुरस्कार मिळाला. उतर विभागाचे सर्व क्लासरूम डिजिटल करण्याचा धाडसी निर्णय घेवून विभागातील १९७४ खोल्यांपैकी आजअखेर १८५० खोल्यांना इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल बसविण्यात आले आहेत.पायाभूत सुविधांची निर्मिती करतांना संगणक कक्ष अत्याधुमिक करून नवीन संगणक १५६५ विविध शाखांना दिले आहेत.
दरम्यान, शनिवारी (१४) कोपरगाव येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत राजकारणाबद्दल व तेथील कारभाराबाबत सूचक विधान केले होते. त्याचा आणि रयत शिक्षण संस्थेच्या इतर विभागाचा कुठलाही संबंध नसून त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचे एम.टी.रोहमारे यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS