भाळवणी : रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च कामगिरीचा आदर्श विद्यालय कर्मवीर पुरस्कार महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक भाळवणी विद्यालयास सातारा ये
भाळवणी : रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च कामगिरीचा आदर्श विद्यालय कर्मवीर पुरस्कार महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक भाळवणी विद्यालयास सातारा येथे कर्मवीर जयंती कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत व संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, ना. दिलीप वळसे तसेच चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन अँड. भगिरथ शिंदे, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, सचिव विकास देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब नाईकवाडी, स्कूल कमिटी सदस्य अशोक रोहोकले, संस्थेचे सल्लागार समिती सदस्य संदीप रोहकले, पर्यवेक्षक सदानंद सोनावळे, रयत बँकेचे संचालक अशोक झरेकर, विद्यालयाचे शिक्षक गोरख जाधव, विजय मुळे, महेश महांडुळे, संतोष रोहोकले, संदीप वाघ नानासाहेब शिंदे, अमोल भोंडवे, बाळासाहेब नाईक पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते, विद्यालयास प्रथमच हा कर्मवीर आदर्श विद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल भाळवणी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन मुरलीधर रोहोकले, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, भाळवणी व परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी, सोसायटी चेअरमन व सर्व पदाधिकारी, पालक शिक्षणप्रेमी, सर्व संस्थांचे पदाधिकारी यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS