कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत येथील चंद्रकांत निवृत्ती राऊत व भामाबाई चंद्रकांत राऊत यांचा अमृतमहोत्सव सोहळा कर्जतमध्ये संपन्न झाला. बिजमाता, पद्मश्री
कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत येथील चंद्रकांत निवृत्ती राऊत व भामाबाई चंद्रकांत राऊत यांचा अमृतमहोत्सव सोहळा कर्जतमध्ये संपन्न झाला. बिजमाता, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. खा. सदाशिव लोखंडे, आ. रोहित पवार, सुनंदाताई पवार, राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ तसेच चंद्रकांत राऊत यांच्यासमवेत काम केलेले अनेक सहकारी, मार्गदर्शक मंचावर उपस्थित होते. नगराध्यक्षा उषा राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, आई-वडिलांनी मोठ्या कष्टातून आम्हाला वाढवले, संस्कार दिले. त्यांचा सन्मान व्हावा म्हणून सामाजिक उपक्रम राबवून राऊत कुटुंब व मित्र परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम घेतला. आपले कर्तृत्व सिद्ध करून भारतात नाव कमावलेल्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते होणारा हा सन्मान कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, मला आमदार करण्यात राऊत कुटुंबाचा मोठा वाटा आहे. या कुटुंबांने अनेक वर्षांपासून कौटुंबिक स्नेहसंबंध जपले आहे. राहीबाई पोपेरे यांनी आपल्या भाषणातून राऊत दाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी उपस्थितांना सांगितली. त्यानंतर राऊत दाम्पत्याची वही- पुस्तक तुला करून त्याचे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. डॉ. अश्विनी राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन झाले.
कुटुंबात संस्कार रुजवण्याचे काम केले : आ. पवार – यावेळी आ. रोहित पवार म्हणाले, भाऊंनी मोठ्या कष्टातून कुटुंब उभे केले. मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. कुटुंबात संस्कार रुजवण्याचे काम त्यांनी केले. भाऊ आणि ताईंनी लोकांमध्ये जावून काम केले. कष्टाचे महत्व त्यांनी आपल्या मुलांना शिकवले.
COMMENTS