Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रसाळगुरूजींचे रसाळ ’बोधामृत’ जीवनपोषक ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः कथा ही मानवी संस्कृतीची गुरुकूलरूपी ज्ञानशाळा असून आजच्या तंत्रयुगात संगमनेर येथील सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक दत्तात्रय सावळेराम

ज्ञानशील कुटुंबासाठी प्रत्येक घरात छोटे पुस्तकालय असावे ः डॉ. बाबुराव उपाध्ये
जेथे पुस्तक तेथे भारी मस्तक ः डॉ. बाबुराव उपाध्ये
दुर्गामातांचा डॉ. महांडुळे यांनी केलेला सन्मान स्त्रीशक्तीचा उत्सव ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः कथा ही मानवी संस्कृतीची गुरुकूलरूपी ज्ञानशाळा असून आजच्या तंत्रयुगात संगमनेर येथील सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक दत्तात्रय सावळेराम रसाळगुरुजींचे रसाळ ’बोधामृत’ जीवनपोषक असल्याचे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर येथील आसरा प्रकाशनतर्फे माजी मुख्याध्यापक द.सा. रसाळगुरुजी यांच्या’ बोधामृत’ कथासंग्रहाचे प्रकाशन संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे संगमनेर येथील भंडारी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. उपाध्ये यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक, समाजसेवक संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे महासंघ अध्यक्ष सोमनाथ कळसकरगुरुजी होते. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. प्राचार्य ज्ञानेश्‍वर गोंगटे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी बोधामृत पुस्तकाचे प्रकाशन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले.मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अ‍ॅड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रस्तावनाकार डॉ. शिवाजी काळे, प्रकाशिका मोहिनी काळे, अरुण आहेर, मुठे वाडगावचे मा. पोलीस पाटील वसंतराव मुठे पाटील, प्रा. शिवाजीराव बारगळ, संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक सेवासंघ अध्यक्ष सोमनाथ सातपुते, राजहंस ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष डॉ. जी.पी. शेख, महेश ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष गणेशलाल बाहेती, कल्याणकारी सेवाभावी संघ अध्यक्ष रत्नाकर पगारे, तालुका ईपीएस 95 पेन्शनर संघटना अध्यक्ष सुभाषराव पोखरकर, ज्ञानेश्‍वर राक्षे, संजय रसाळ आदिंनी आपल्या मनोगतातून द.सा. रसाळगुरूजींच्या ’बोधामृत’ पुस्तकाच्या निमित्ताने आठवणी सांगत शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ. उपाध्ये यांनी आपली नवी पुस्तके’ माकडांच्या हाती शाळेची खिचडी’,’ ग्रंथसंवाद’ पुस्तके सर्व मान्यवदना भेट दिली. रसाळ गुरुजींनी बोधामृत पुस्तक सर्वांना भेट दिले. डॉ. उपाध्ये यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ठ झाल्याबद्दल रसाळ गुरुजींनी डॉ. उपाध्ये यांचा सत्कार केला  रसाळगुरुजींनी आपल्या भावशब्दातून झालेला आदर्श प्रकाशन सोहळा, ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड उपस्थिती, त्यांनी केलेले आत्मीय सत्कार याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी रसाळ गुरुजींचे ’ घडता घडता’ हे आत्मचरित्र, स्पर्श पुस्तक ह्या पुस्तकांचे लेखन आणि समाजाला पारंपरिक संस्काराचा आजीचा कथाबटवा वाटावा असे संस्कार देणारे’ बोधामृत’ हे पुस्तक लहानांपासून मोठयांपर्यत सर्वांना हवेहवेसे वाटेल इतके सुंदर पुस्तक असल्याचे सांगून’ ज्ञानदीप लावू जगी अशी संत नामदेवासारखीच भूमिका रसाळगुरुजींची असून ते आजचे साने गुरुजी आहेत.88 व्या वर्षी त्यांनी आपले लेखन सुरु ठेवले, तो आदर्श घ्यायाला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.अध्यक्ष सोमनाथ कळसकरगुरुजी यांनी आपल्या भाषणातून रसाळ गुरूजींनी बोधामृत लिहिल्याबद्दल कौतुक करून ज्येष्ठ नागरिकांचा हा स्तुत्य उपक्रम आहे असे सांगितले. यावेळी प्राचार्य सहदेव चौधरी,युवावार्ताचे संपादक किसनराव हासे, नंदकिशोर बेल्हेकर, अरविंद गाडेकर, मनिषाताई रसाळ, डॉ. सोमनाथ सातपुते, सुरेशशेठ जाजू, विजयराव रसाळ, सौरभ रसाळ, रोहिणी रसाळ, अथर्व रसाळ आदीसह रसाळ परिवार आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, रसिक मित्रपरिवार उपस्थित होते. रसाळ परिवाराने आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेने कार्यक्रम उत्तम केला, त्याबद्दल शेवटी नंदकिशोर बेल्हेकर यांनी आभार मानले.

COMMENTS