Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रहमान फिरले सांगून उपायाच्या बहाण्याचे मुलीचा विनयभंग

फिर्याद दाखल होताच भोंदु बाबा बाप-लेकाचे ग्रहमान फिरले

देवळाली प्रवरा ः तुझे ग्रहमान फिरलेले आहे, मी तुला उपाय सांगतो व एक वस्तु देतो. असे सांगुन भिक्षा मागण्यासाठी आलेल्या एका भोंदू बाबाने एका 13 वर्

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी
साई मल्टीस्टेटने व्यावसायिकांना आधार देण्याचे काम केले ः खा. लोखंडे
विखेंनंतर आता बाळासाहेब थोरात करणार संगमनेरमध्ये शक्तीप्रदर्शन…

देवळाली प्रवरा ः तुझे ग्रहमान फिरलेले आहे, मी तुला उपाय सांगतो व एक वस्तु देतो. असे सांगुन भिक्षा मागण्यासाठी आलेल्या एका भोंदू बाबाने एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला मीठी मारुन तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. परिसरातील नागरिकांनी बाप व मुलगा असलेल्या दोघां भोंदू बाबांची यथेच्छ धुलाई करुन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली.
            या घटनेतील पिडीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही देवळाली प्रवरा परिसरात तीच्या कुटुंबासह राहते. सकाळी दहा वाजे दरम्यान पिडीत मुलगी तीच्या घरात एकटीच होती. त्यावेळी बाप व मुलगा असलेले दोन भोंदू बाबा भिक्षा मागण्यासाठी आले. त्यांनी पाणी पिण्यासाठी मागीतले. पिडीत मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून भोंदू बाबांनी आम्ही थोडावेळ घरात बसतो. असे सांगुन बसण्यासाठी चटई मागीतली. तेव्हा पिडीत मुलीने त्यांना बसण्यासाठी चटई दिली. त्यानंतर बाप व मुलगा असलेल्या भोंदू बाबा पैकी मुलाने बोलबच्चन करुन तुझे ग्रहमाण फिरलेले आहे. मी तुला उपाय सांगतो व  एक वस्तु देतो. असे सांगुन पिडीत मुलीचा हाथ धरून जवळ ओढले आणि मीठी मारली. त्यानंतर तीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पिडीत मुलीने आरडाओरडा केला असता भोंदू बाबांनी तेथून पळ काढला. परिसरातील काही तरुणांनी दोन्ही भोंदू बाबांना पकडून त्यांची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी नारायण आप्पा जाधव, रा. बाबर नगर, पैठण नाका, अंबड, जि. जालना याच्या विरोधात गून्हा रजि. नं. 666/2024 भादंवि कलम 354 तसेच पोस्को अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

COMMENTS