Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; अल्पवयीन युवक बालसुधारगृहात

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुका पुन्हा एकदा हादरला असून कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा घडला आहे. गुन्हा कोयननगर पोलीस स्टेशनमध

राजे प्रतिष्ठानची लवकरच नवी कार्यकारिणी : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले
फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
फलटण नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुका पुन्हा एकदा हादरला असून कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा घडला आहे. गुन्हा कोयननगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून संबंधित अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
कोयना परिसरातील एका गावातील 15 वर्षीय युवतीवर अल्पवयीन युवकांने अत्याचार केला. अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित युवती गरोदर आहे. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी कोयना पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर कोयना पोलीसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोक्सो अंतर्गत संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित हा अल्पवयीन असल्याने आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
या घटनेनंतर कोयना भाग हदरून गेला असून तालुक्यातील ही चौथी घटना आहे. अशा वाढत्या घटनेबाबत कठोर शिक्षा होण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. पाटण तालुक्यातील अशा वाढत्या गुन्हेगारीबाबत पुन्हा एकदा लोकांमध्ये चर्चेला उधान आले आहे. या घटनेचा तपास कोयनानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.

COMMENTS