Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून खून; नराधमाला अटक

ढेबेवाडी / वार्ताहर : विभागातील एका गावातील सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह कालरात्री गावातीलच एका ओघळीत आढळून आला. बलात्कार करून तिचा खून केल्याचा प

दांडेघर येथील डोंगराला मोठ-मोठ्या भेगा; शाळेच्या इमारतीला धोका
माण देशी चॅम्पियन्सच्या उपक्रमामुळे म्हसवडमध्ये जलतरण स्पर्धा; राज्यातील लोकांमध्ये आश्‍चर्य
जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे 20 फेब्रुवारी ला शुभारंभ; राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांची माहिती

ढेबेवाडी / वार्ताहर : विभागातील एका गावातील सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह कालरात्री गावातीलच एका ओघळीत आढळून आला. बलात्कार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून याप्रकरणी संतोष चंद्रू थोरात (रा. सुतारवाडी, रुवले, ता. पाटण) या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मृत बालिका इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होती. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घराबाहेर खेळायला गेली. मात्र, उशिरापर्यंत घराकडे परतली नाही. गिरणीतून दळण घेवून घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर शोधाशोध करण्यात आली. मात्र, ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांना कळविले. सपोनि संतोष पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून कसून तपास सुरू केला.
एकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, या प्रकरणाचा उलगडा झाला. संतोष चंद्रु थोरात असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस त्या मुलीच्या मृतदेहापर्यंत पोहचले. संशयिताने बालिकेचवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांनी भेट देवून तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या. कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

COMMENTS