औरंगाबाद ः महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कन्नड मतदार संघातून विधानसभा निवडणुकीची
औरंगाबाद ः महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कन्नड मतदार संघातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. त्या पती हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात आमदारकीची निवडणूक लढवण्याच्या चर्चेने जोर धरलाय.रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातले सख्य जगजाहीर आहे. त्यामुळे दानवेंनीही आपल्या कन्येसाठी कंबर कसल्याचे समजते. फक्त त्या भाजपकडून रिंगणात उतरतील की, अन्य पक्षाकडून हे येणारा काळच सांगेल.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड सोयगाव मतदार संघाचा आखाड्याची जास्त चर्चा आहे. मराठवाड्यातले भाजपचे वजनदार नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या यंदा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांची निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. विविध सामाजिक कार्यक्रमांना त्या आवर्जून हजेरी लावत आहेत. संजना जाधव यांचे पॉलिटिकल ब्रँडिंग सुरु असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे संजना जाधव त्यांच्या पतीविरोधात या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. कन्नड सोयगाव मतदार संघावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा प्रभाव आहे. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जाधव यांना शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी पराभूत केले होते. त्यानंतर आता 2024 च्या निवडणुकांमध्ये पत्नी संजना जाधव यांच्याकडूनच त्यांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या गेल्या काही दिवसापासून मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत आहेत. लग्न समारंभ, यात्रा जत्रांमध्ये त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. सोशल मीडियातून त्यांचे कार्यक्रमांचे फोटो शेअर केले जात आहेत. त्यामुळे संजना जाधव या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मराठवाड्यात भाजपच्या दोन नेत्यांचा प्रभाव आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. आपापल्या क्षेत्रात दोन्ही नेत्यांची चांगलीच पकड आहे. आता कन्नड सोयगाव मतदार संघातून दानवे यांच्या कन्या राजकीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी हा आखाडा निश्चितच आव्हानात्मक ठरू शकतो. दरम्यान, मध्यंतरी हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती बरी नसल्याने ते राजकीय वारसदार घोषित करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. वारंवार लक्षवेधी वक्तव्य करून प्रसिद्धी झोतात असलेल्या हर्षवर्धन जाधव यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.
COMMENTS