नोएडातील ट्वीन टॉवर पाडले राव,

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नोएडातील ट्वीन टॉवर पाडले राव,

नगरमधील अतिक्रमणे कधी काढता? स्थायी सभापतींचा मनपा प्रशासनाला सवाल

अहमदनगर/प्रतिनिधी- दिल्लीजवळील नोएडातील कोट्यवधी रुपये किमतीचे ट्वीन टॉवर बेकायदेशीर असल्याने पाडले आहे राव...तुम्ही नगरमधील तक्रारी असलेली अति

आ. जगतापांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार…मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
आईच झाली वैरीण ! पाच महिन्याच्या बाळाची गळा दाबून हत्या
पंतप्रधान नरेंद्र मोदीना दाढी कटींग करण्यासाठी चहा विक्रेत्याने पाठवली १०० रूपयांची मनिआँडर l पहा

अहमदनगर/प्रतिनिधी- दिल्लीजवळील नोएडातील कोट्यवधी रुपये किमतीचे ट्वीन टॉवर बेकायदेशीर असल्याने पाडले आहे राव…तुम्ही नगरमधील तक्रारी असलेली अतिक्रमणे तरी कधी काढता?, असा सवाल स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे(Kumar Singh Vakle) यांनी मनपा प्रशासनाला गुरुवारी केला. पावसाळा यंदा 15 दिवस लवकर संपणार आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाळ्याचे कारण सांगून टाळाटाळ करू नका, असे उपरोधिक भाष्यही त्यांनी केले. दरम्यान, नगर शहरातील अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांसमोरील पार्किंग जागेत शेड ठोकल्या असल्याने त्यांच्याकडे येणारी वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे आधी या शेड व तेथील लोखंडी जाळ्या जप्त करण्याचे आदेश वाकळे यांनी दिले.

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत अजेंड्यावरील विषय अवघ्या काही मिनिटात मंजूर झाले. मात्र, त्यानंतर शहरातील अतिक्रमणे, पाणीपुरवठा, ठेकेदारांची रखडलेली बिले, कोरोना काळात झालेल्या खर्चाचा हिशेब अशा विविध विषयांवर जोरदार चर्चा झडली. अतिक्रमणांमुळे सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौक व पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौकात मारामार्‍या होण्याची वेळ आली आहे. बहुतांश 9 ते 12 मीटरचे रस्ते अतिक्रमणाांमुळे 3-4 मीटरचे राहिले आहेत, बहुतांश विक्रेत्यांनी आपल्या गाळ्यासमोर शेड व लोखंडी जाळ्या टाकल्या आहेत, काही पदपथ विक्रेते रस्त्याच्या कडेला न बसता आता थेट रस्त्यात बसू लागल्याने वाहतुकीला अडथळे येत आहेत. पण मनपा त्यांच्याकडे येणार्‍या तक्रारींचीही दखल घेत नाही, असे उद्वीग्न भाष्य सभापती वाकळे यांनी केेले. त्यांच्या या भूमिकेला नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, रवींद्र बारस्कर, सचिन शिंदे, गणेश कवडे, समद खान यांनीही साथ देत अतिक्रमणांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास मांडला. यावेळी सभापती वाकळेंनी अतिक्रमण विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, सावेडी प्रभाग समिती प्रमुख जितेंद्र सारसर, नगर शहर प्रभाग समिती प्रमुख राकेश कोतकर व केडगाव प्रभाग समिती प्रमुख नाना गोसावी यांना धारेवर धरले. 

अतिक्रमणे हटवण्याच्या येणार्‍या मागण्या व तक्रारी तरी प्राधान्याने सोडवा, असे आवाहन वाकळे यांनी सर्वांना केले. त्यावर, या चौघांनीही अतिक्रमण हटवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे सांगितले तसेच मनपाची अतिक्रमण हटावची एकच गाडी असल्याने ती जेव्हा मिळेल, तेव्हा आम्हाला अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी लागते, अशी अडचण सांगितली. यावर किमान दिवाळीच्या सणापर्यंत तरी आणखी एक अशी गाडी उपलब्ध करण्याबाबत आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे मागणी करू, असे सभापती वाकळेंनी स्पष्ट केले.हजारावर अतिक्रमणेमनपाच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या परिसरात प्रत्येकी सुमारे दोनशेवर अतिक्रमणे आहेत. 

सावेडीत प्रोफेसर कॉलनी चौक, एकवीरा चौक, भिस्तबाग चौक, सेंट मोनिका महाविद्यालय तसेच शहरात चितळे रोड, जुना कोर्ट रोड परिसरात अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होते व तेथून जाताना नागरिकांचा दम घुटतो. घासगल्लीतही आता पुन्हा हातगाड्यांची अतिक्रमणे झाल्याने तेथूनही जाताना नागरिकांचे हाल होतात. 9-9 मीटरचे रस्ते 3-4 मीटरचे झाले आहे व त्यामुळे वाहतुकीत अडकलेल्यांची भांडणेही होऊ लागली आहेत, असे सभापती वाकळेंनी सांगताच, स्थायी समितीने अतिक्रमण हटवण्याचा ठराव करण्याचे अभियंता सातपुतेंनी सुचवल्यावर संतापलेल्या वाकळेंनी त्यांना सुनावले. अतिक्रमणे काढण्यासाठी तुम्हाला स्थायी समितीचा ठराव लागतो, पण अन्य सोयीच्या अनेक परवानग्या तुम्ही (प्रशासन) परस्पर देतात, त्यावेळी स्थायीची परवानगी तुम्हाला आवश्यक वाटत नाही. आता अतिक्रमण हटवण्याचा स्थायी ठराव तुम्ही लोकांना दाखवून आम्हाला अडचणीत आणणार, पण अतिक्रमण हटवणे हे तुमचे नेहमीचे काम असताना ते टाळणार, असा घणाघातही त्यांनी केला. अखेर, इमारतींमधील व्यावसायिक गाळ्यांसमोरील पायर्‍या, लोखंडी जाळ्या, ओटे, शेड जप्त केले जावेत, मनपाचे केअरटेकर-झाडूवाले-आरोग्य कर्मचार्‍यांकडून प्रभागांतील अतिक्रमणांची माहिती घेऊन त्यावर नियमितपणे कारवाई करावी तसेच मनपाची अतिक्रमण हटावची गाडी प्रत्येक प्रभाग समितीला 7 दिवस सलगपणे देऊन तिच्याद्वारे कारवाई करण्याचे आदेश वाकळेंनी दिले.

नागरिक टाकतात दगडी तोडी– लन्यांतून आता अतिक्रमणांचे नवे प्रकार समोर आले आहेत, असे खुद्द सभापती वाकळेंनीच बैठकीत सांगितले. अनेकांनी आपल्या बंगल्याच्या वा घराच्या कंपौंडबाहेर मोठ्या दगडी तोडी ठेवल्या आहेत. तेथून कोणाची गाडी जाऊ नये वा तेथे कोणी गाडी उभी करू नये, म्हणून असे उद्योग केले गेले आहेत. पण, यामुळे अपघातांची शक्यता असल्याने मनपा प्रशासनाने कॉलन्यांतूनही असे अतिक्रमण हटाव राबवावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.–फोटो ओळीनगर शहरातील रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांबाबत स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी मनपा अधिकार्‍यांना धारेवर धरले.

COMMENTS