Homeताज्या बातम्यामनोरंजन

राणी मुखर्जीच्या सासू पामेला चोप्रा यांचं निधन

बॉलिवूडचे लोकप्रिय दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा  यांच्या पत्नी पॅमेला चोप्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

शिवसेना कुणाची ? आजपासून सुनावणी
नाशिकचे माजी आमदार बबनराव घोलप शिंदे गटाच्या वाटेवर 
रिचा-अलीचा जबरदस्त डान्स

बॉलिवूडचे लोकप्रिय दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा  यांच्या पत्नी पॅमेला चोप्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पॅमेला यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीला मोठा धक्काबसला आहे. पॅमेला या एक उत्तम गायिका होत्या. त्यांनी यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांना म्युझिक दिलं होतं. इतकंच काय तर त्या एक फिल्म राईटर आणि निर्मात्या देखील होत्या. ट्रेड अॅनलिस्ट कोमल नाहटा यांनी आजतकला पॅमेला यांच्या निधनाच्या दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आज सकाळी अखेरचा शेवट केला आहे. पॅमेला यांनी 1970 साली पारंपारिक पद्धतीनं यश चोप्रा यांच्याशी लग्न केलं होतं. यश चोप्रा यांना कोणत्या चित्रपटाच्या पटकथेवर काही चर्चा करायची असेल तर ते पॅमेला यांचीशी बोलायचे त्यांचे काय मत आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असायचं. तर पती यश चोप्रा यांच्या निधनाच्या जवळपास 11 वर्षांनंतर पॅमेला यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पॅमेला यांना दोन मुलं असून आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा असं त्याचे नाव आहे. तर अभिनेत्री राणी मुखर्जी त्यांची सून आहे. पॅमेला यांच्या निधनानं संपूर्ण कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. तर बॉलिवूडमध्ये शोककळा पसली आहे. पॅमेला यांनी फक्त त्यांचे पती यश चोप्रा यांच्या चित्रपटांमध्येच गाणी गायली होती. 1993 साली प्रदर्शित झालेल्या आईना या चित्रपटाची निर्माती पॅमेला चोप्रा यांनी केली होती. पॅमेला यांनी पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि प्रोफशन्ल लेखकर तनुजा चंद्रा यांच्यासोबत 1997 साली प्रदर्शित झालेल्या दिल तो पागल हे या चित्रपटासाठी पटकथा लिहिली होती. याशिवाय ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील ‘एक दुजे के वास्ते’ या पहिल्या गाण्यासाठी त्या मोठ्या पडद्यावर दिसल्या होत्या. तर या गाण्यात पॅमेला यांनी यश चोप्रा यांच्यासोबत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 

COMMENTS