Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणेंना राज्यसभेवर संधी नाहीच

मुंबई ः भाजपने राज्यातील लोकसभेसाठी अजूनही आपले पत्ते ओपन केले नसले तरी, भाजप सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी वेगळ्या चेहर्‍यांना लोकसभेसाठी मैदानात उ

मनोज जरांगेंनी आरक्षणाचा अभ्यास करावा
नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना दिला पुन्हा जेलवारी घडवण्याचा इशारा

मुंबई ः भाजपने राज्यातील लोकसभेसाठी अजूनही आपले पत्ते ओपन केले नसले तरी, भाजप सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी वेगळ्या चेहर्‍यांना लोकसभेसाठी मैदानात उतरवणार असल्याचे दिसून येत आहे. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भाजपने आपल्या पक्षात घेतल्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे, यासोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मात्र राज्यसभेवर संधी देण्याचे भाजपने नाकारल्याचेच दिसून येत आहे. राणेंना आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संसदेत पाठवण्याची व्युहरचना भाजपश्रेष्ठींनी आखली आहे.

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपमधील राज्यसभा निवडणुकीची समीकरणे बदलली असून, भाजपला कोणताही धोका न पत्करता त्यांना राज्यसभेवर पाठवायचे आहे. भाजप त्यांच्यासाठी आवश्यक ते संख्याबळ गाठेल. पण उर्वरित 2 जागांसाठी नारायण राणे व पियुष गोयल यांच्यात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाने या दोघांना आगामी लोकसभा निवडणुकीत उतरवून संसदेवर घेण्याची रणनीती आखली आहे. नारायण राणेंशिवाय पियुष गोयल व भागवत कराड या 2 राज्यसभा सदस्यांनाही यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल. यापैकी पियुष गोयल यांना मुंबईतील एखाद्या सुरक्षित मतदार संघातून उमेदवारी दिली जाईल. पण कराड यांना छत्रपती संभाजीनगर की अन्य एखाद्या मतदार संघातून मैदानात उतरवले जाईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

COMMENTS