Homeताज्या बातम्यामनोरंजन

रणबीर- आलियाने दाखवला लेक राहाचा चेहरा

मुंबई प्रतिनिधी - लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुलगी राहा हिच्या जन्मापासूनच चाहते तिच्या कॅमेरासमोर ये

ऊपोषणास बसलेल्या २२ ऊपोषणकर्त्या पैकी 11 जणांची प्रकृती खालावली (Video)
व्हिडिओ कॉलवर कोणासोबत बोलतीये? प्रश्न विचारताच पतीची केली भयानक अवस्था | LOKNews24
हनीट्रॅप ब्लॅकमेलिंग जाळ्यात अडकला क्लासवन अधिकारी ; नगर तालुका पोलिसात दुसरा गुन्हा दाखल, 3 कोटीची मागणी

मुंबई प्रतिनिधी – लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुलगी राहा हिच्या जन्मापासूनच चाहते तिच्या कॅमेरासमोर येण्याची वाट पाहत आहेत. राहाच्या जन्मापासूनच रणबीर आणि आलियाने नो कॅमेरा पॉलिसी पाळली होती. ते आपल्या मुलीला मुळीच कॅमेरासमोर येऊ देत नव्हते. तिचा चेहरा दिसेल असा एकही फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला नव्हता. मात्र आता अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. ख्रिस्तमस पार्टीसाठी आलेल्या रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा चेहरा नेटकऱ्यांना दाखवला आहे. तिला पाहून नेटकरी भलतेच खुश झाले आहेत. तिचा चेहरा पाहून नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे. ती अगदीच आपल्या आजोबांसारखी दिसत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.रणबीर आणि आलिया यांनी नुकतीच ऋषी कपूर यांच्या घरी ख्रिस्तमस पार्टीसाठी हजेरी लावली होती. घरात जाण्यापूर्वी रणबीर छोट्याश्या राहाला स्वतःहून पापाराझींसमोर घेऊन आला. त्याच्या पाठोपाठ आलीयादेखील आली. चिमुकल्या राहाला पाहून नेटकरी तिच्यावर भाळले आहेत. ती अगदीच गोंडस दिसत आहे. तिचे डोळेही घारे असल्याने नेटकरी तिच्या डोळ्यांचंही कौतुक करत आहेत. ती रणबीर किंवा आलियासारखी दिसत नसून आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आलियाने आपल्या लेकीच्या केसांचे दोन चंबू बांधले आहेत. पांढऱ्या फ्रॉकमध्ये ती खूप गोड दिसत आहे. तिला पाहून नेटकरी तिचं कौतुक करताना थकत नाहीयेत.गेले कित्येक महिने चाहते राहाला पाहण्यासाठी आतुरले होते. आता अखेर तिला पाहून सगळ्यांना तैमूर आणि जेहचाही विसर पडला आहे. यापुढे चाहते राहाला पाहण्यासाठी उत्सुक असतील यात शंका नाही.

COMMENTS