Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामशिंग बाबांचा जंगी यात्रा उत्सवाचे उद्या आयोजन

Oplus_131072 कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध जागृत ठिकाण असलेल्या रेल्वे नारंदी पुलाजवळील श्री रामशिंग बाबांचा सालाबादप्रमाणे

करोडोंचा दानधर्म, पाहा अक्षय कुमारची संपत्ती किती? l पहा LokNews24
सरनाई यांच्या पत्राची लिंक ठाकरे-मोदी भेटीत! l DAINIK LOKMNTHAN
शिवद्रोही श्रीपादसह बंधू श्रीकांत छिंदमही तडीपार | DAINIK LOKMNTHAN
Oplus_131072

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध जागृत ठिकाण असलेल्या रेल्वे नारंदी पुलाजवळील श्री रामशिंग बाबांचा सालाबादप्रमाणे याही वर्षी जंगी यात्रा उत्सव बुधवार दि 8 मे रोजी विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने आयोजित केला असल्याची माहिती श्री रामशिंग बाबा जंगी यात्रा उत्सव आयोजकांच्या वतीने सांगितले आहे.
या विषयी श्री रामशिंग बाबा जंगी यात्रा उत्सव आयोजकांच्या वतीने दिलेल्या अधिक माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गाव हद्दीतील रेल्वे स्टेशन नारंदी पुलाजवळ असलेल्या श्री रामशिंग बाबांचा यात्रा उत्सव बुधवार 8 मे 2024 रोजी आयोजित केला असून सकाळी 7 वाजता देवाला गंगास्नान, 8 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 4 वाजता श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी समाधी आश्रमाचे मठाधिपती प.पु रमेशगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट होणार आहे तर दुपारी 4 वाजता वारी शिंगवे येथील ह.भ.प प्रतीक्षाताई जाधव महाराज यांचे हरिकीर्तन होणार असून दुपारी 12 वाजेपासून  उपस्थित सर्वच भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून तरी जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रा उत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन श्री रामशिंग बाबा जंगी यात्रा उत्सव आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS