Homeताज्या बातम्यादेश

रामोजी ग्रुपचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

हैदराबाद : रामोजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. उच्च रक्त

माधुरी तिय्या यांना प्रहार जीवनगौरव व प्रहाररत्न पुरस्कार
30 वर्षीय व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह करत नदीत उडी मारून केली आत्महत्या
पुण्यात प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार

हैदराबाद : रामोजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. उच्च रक्तदाब आणि श्‍वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना 5 जून रोजी हैदराबादमधील नानकरामगुडा येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी पहाटे 4:50 वाजता त्यांचे निधन झाले. रामोजी राव यांचे पार्थिव त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील कार्पोरेट ऑफिसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. इथे त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि हितचिंतक त्यांच अंत्यदर्शन घेण्यासाठी येत आहेत. 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावात एका कृषी कुटुंबात जन्मलेल्या, रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केल्या जात आहे.

रामोजी राव यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो : मोदी – रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो. रामोजी राव यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, सहवेदना या आशयाची पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.

COMMENTS