Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात

श्रीगोंदा : श्रीगोंद्यात शहरा सह तालुक्यात रमजान ईद (ईद-उल फित्र) सोमवारी (दि. ३१ मार्च) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी १० वाजता ईदची सा

मुलीचा गळा आवळून बापाची आत्महत्या
पतीने केली पत्नीची हत्या
…तर, आमदारांच्या निवासासमोरच राहुटी टाकणार

श्रीगोंदा : श्रीगोंद्यात शहरा सह तालुक्यात रमजान ईद (ईद-उल फित्र) सोमवारी (दि. ३१ मार्च) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी १० वाजता ईदची सामुदायिक नमाज शहरातील आनंदकर मळा येथील ईदगाह मैदानावर मौलाना जैनुद्दीन आतार यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आली नमाजसाठी शहरा सह तालुक्यातील मुस्लिम बांधव अबालवृध्दांसह हजारोच्या संख्येने उपस्थित होते. तर महिलांची ची सामुदायीक नमाज सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे संपन्न झाली, रमजानच्या महिन्यात केलेल्या रोजा (उपवासाची) सांगता ईदच्या दिवशी झाली.

    रमजान महिन्याच्या २९ उपवासनंतर रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील विविध भागातील मशिदमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मशिदमध्ये मुस्लिम भाविकांनी नमाज अदा केली.  ईदगाहच्या सामुदायिक नमाजनंतर धार्मिक एकात्मता आणि देशाच्या समृध्दी व शांततेसाठी अल्लाह चरणी प्रार्थना करण्यात आली. नमाजनंतर शहरातील कब्रस्तान व शेख महंमद बाबा दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले या बेत होता रविवारी झालेला गुढी पाडवा व सोमवारी झालेल्या ईदवा उत्साह शहरात दिसून आला. शहरात दिवसभर मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या व पाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा देत होते यानिमित्त शहरात सामाजिक एकतेचे दर्शनही घडले.

             ईदगाह येथे माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, घनश्याम शेलार, मनाहेर पोटे, सुधिर खेडकर, बापु तात्या गोरे, प्रशांत गोरे, अशोक खंडके, संग्राम घोडके, अंबादास औटी, टिळक भोस, अरविंद कापसे, नाना शिंदे,मुकुंद सोनटके, भाऊसाहेब खेतमाळीस, शहाजी खेतमाळीस, नाना कोथिबिरे, बाळासाहेब दूतारे, सतीश बोरुडे, धनराज कोथिंबीरे, राजेंद्र उकाडे, सचिन महाडीक, अण्णा पाटील, सुरेश देशमुख ,श्रीगोंदा पोलिस उप निरीक्षक आहिरे सह आर्दीनी ईद निमित्त मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS