बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच राखीचा हायव्होल्टेज ड्रामा

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच राखीचा हायव्होल्टेज ड्रामा

 'बिग बॉस मराठी 4' खूप रंजक होत चालला आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात चार सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.  कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्

शंभू सीमेवर शेतकरी-पोलिसांत धुमश्‍चक्री
आनंदोत्सव साजरा करतांना संकटाचेही भान ठेवा!
बालिकेचे अपहरण करणारा पाठलाग करून पकडला

 ‘बिग बॉस मराठी 4’ खूप रंजक होत चालला आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात चार सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.  कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राखी घरातील एका सदस्यासोबत राडा घालताना दिसत आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून तेजस्विनी लोणारी आहे. राखीने घरात पाय ठेवताच तिच्या नावाची पाटी पहिल्या क्रमांकावर लावली. तिने तेजस्विनीची पाटी काढून तिची पाटी लावल्यामुळे दोघींमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे राखीने पाय ठेवताच घरामध्ये राड्याला सुरुवात झालेली पहायला मिळाली. राखी बिग बॉसच्या घरात आणि कोणताच राडा होणार नाही असं तर पहायला मिळणार नाही.

COMMENTS