रक्षकच झाला भक्षक…पोलिसावर अत्याचाराचा गुन्हा

Homeताज्या बातम्या

रक्षकच झाला भक्षक…पोलिसावर अत्याचाराचा गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिसावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. रक्षक असलेला पोलिसच भक्षक झाल्याने याबाबत संताप व्यक्त

सहा कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित
सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर | ‘१२ च्या १२ बातम्या’ | Lok News24
शेवगाव दंगलप्रकरणी सूड भावनेतून गुन्हे दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिसावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. रक्षक असलेला पोलिसच भक्षक झाल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस अंमलदाराने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस अंमलदारसह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध अत्याचार, फसवणूक व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कल्याण ईस्ट (ठाणे) येथे राहणार्‍या तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिस अंमलदार किरण कोळपे, आशाबाई कोळपे, तिचा भाऊ सीताराम, त्यांचा एक नातेवाईक उत्तम, आशाबाईच्या मामाचा मुलगा भारत (पूर्ण नाव माहिती नाही, रा. विळद ता. नगर) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकाराने विळद व एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.
जून 2006 ते जानेवारी 2022 दरम्यान ही घटना घडली असल्याचे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आशाबाई कोळपे, तिचा भाऊ सीताराम, नातेवाईक उत्तम व भारत यांनी संगमताने मला 2006 मध्ये गाडीतून प्रवास करीत असताना पिण्याच्या पाण्यातून औषध देऊन सांताक्रुझ येथे नेले. तेथे अश्‍लिल फोटो काढले तसेच किरण कोळपे याने जबरदस्तीने शारीरिक संबंध करून अश्‍लिल फोटो काढले आहेत. किरण कोळपे याने वेगवेगळ्या ठिकाणी नेवून शारीरिक संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

COMMENTS