राज्यात 1 फेबु्वारीपासून तमाशाचे फड पुन्हा होणार सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 1 फेबु्वारीपासून तमाशाचे फड पुन्हा होणार सुरू

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तमाशा फडावर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आली होती. मा

देशभर केंद्रीय तपास यंत्रणेचा द्वेषापोटी वापर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
पत्रकार आणि त्यांच्या ब्लड रिलेशनमधील नातेवाईकांना तपासणी फीसमध्ये सूट-डॉ.सुरेश साबळे
राष्ट्रवादीचा इस्लामपूर बाजार समितीवर 17-1 ने दणदणीत विजय

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तमाशा फडावर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आली होती. मात्र या कलावंतानी आपल्याला एकतर मानधन तरी द्यावे किंवा तमाशा फडाला परवानगी तरी द्यावी अशी मागणी केली होती. राज्यातील कोरोनाची एकंदर परिस्थितीर पाहून राज्य सरकारने तमाशा फडाला परवानगी दिल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा 01 फेबु्रवारीपासून तमाशाचे फड सुरू होणार आहे. कोरोनाची रुग्णसंख्या घसरायला लागल्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांना काही प्रमाणात परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलली आहेत. सध्या नाट्यगृह आणि चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने सुरू आहे. दोन्ही लस घेतलेल्या आणि युनिव्हर्सल पास असलेल्या व्यक्तींना त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच आता तमाशा कलावंतांसाठीही मोठी बातमी आली आहे. तिसर्‍या लाटेच्या उद्रेकामुळे राज्यातील जत्रा आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. गावात सुरू झालेल्या बैलगाडा शर्यती देखील प्रशासनाने कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बंद करण्यात आल्या. पुण्यातील शाळा आठवडाभर बंदचपुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व शाळा किमान आणखी एक आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहेत. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर यासंदर्भात चर्चाही झाली. अखेर राज्यात 1 फेब्रुवारीपासून तमाशा सुरू करण्यात मुभा दिली आहे. कोरोना काळात नुकसान झाल्याने तमाशा कलावंतांसाठी सरकारने 1 कोटी रुपये जाहीर केल्याची माहिती खेडकर यांनी दिली.

COMMENTS