Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज प्रकरणी जाणीवपूर्वक ट्रॉसिटी टाळणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करा राजेश घोडे

बीड प्रतिनिधी - जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये दलितावर होत असलेला  अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही यामध्येच बीड येथील केज पोलीस स्टेशन अंतर्गत एका

नागाच्या फण्यासारखा चेहरा… तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा l LOK News 24
राहुल वैद्यला जीवे मारण्याची धमकी |LokNews24 (Video)
ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर

बीड प्रतिनिधी – जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये दलितावर होत असलेला  अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही यामध्येच बीड येथील केज पोलीस स्टेशन अंतर्गत एका दलित मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले या प्रकरणामध्ये पोक्सो 306 व 376 दाखल करण्यात आला आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून ट्रॉसिटी क्ट लावण्यात आलेला नाही या घटनेचा निषेध करण्यासाठी व ट्रॉसिटी लावावी या मागणी साठी केज पोलीस स्टेशन येथे दलित समाजातील कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर तेथील पोलीस प्रशासनाने न्याय मागण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यावरच लाठीचार्ज करण्यात आला ही बाब अत्यंत दुर्दैवी असून गंभीर आहे दलितांनी न्याय मागण्यासाठी ही जायचं नाही का हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या घटनेचा मानवी हक्क अभियानाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत व या प्रकरणी तातडीने पोलीस प्रशासनाने ट्रॉसिटी दाखल करून घ्यावी नसता मानवी हक्क अभियानाच्या वतीने लोकशाही मार्गाने संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचे मानवी हक्क अभियानाचे जिल्हा अध्यक्ष राजेश घोडे म्हणाले या प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ग्रहमंत्री, मानवी हक्क आयोग, अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ही तक्रार करणार असल्याचे राजेश घोडे यांनी म्हटले आहे

COMMENTS