अहमदनगर- नगर शहरातील प्रथितयश गायक निवेदक राजेंद्र टाक यांना आर्ट बिट्स महाराष्ट्र कडून राज्यस्तरीय " कला सन्मान" पुरस्कार २०२३- २४ नुकताच

अहमदनगर– नगर शहरातील प्रथितयश गायक निवेदक राजेंद्र टाक यांना आर्ट बिट्स महाराष्ट्र कडून राज्यस्तरीय ” कला सन्मान” पुरस्कार २०२३- २४ नुकताच प्राप्त झाला आहे. पुण्यातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार केवळ महाराष्ट्रातील कलाकारांना दिला जातो. एका सर्वेक्षणातून गेली ३३ वर्ष कला क्षेत्रात उल्लेखनीय अशा कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायन आणि निवेदन शैलीमुळे त्यांचा शहर आणि जिल्ह्यातही मोठा चाहतावर्ग आहे. नवनवीन कार्यक्रमाची निर्मिती आणि राबवत असलेल्या उपक्रमामुळे श्री. टाक नेहमीच चर्चेत असतात. अध्यात्मिक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात देखील ते आपले योगदान देत असतात. अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाने देखील त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त केले आहे. सन्मानपत्र, गोल्ड मेडल आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे पुण्यातील अधिकारी श्री. संतोष पांचाल यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
COMMENTS