राजर्षी शाहू महाराजांनी भारतीय लोकशाहीचा पाया घातला –  प्राचार्य टी. एस. पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजर्षी शाहू महाराजांनी भारतीय लोकशाहीचा पाया घातला – प्राचार्य टी. एस. पाटील

अहमदनगर, ता.२७ : शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात लोककल्याणकारी राज्याची कल्पना मांडली आणि ती अस्तित्वात येण्यासाठी आजन्म प्रयत्न केले. त्यांनी खऱ्या

Ahmednagar : महापालिका अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले, काँग्रेस पक्षाचा घाणाघाती आरोप l Lok News24
 बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्था सभासदांना देणार १२ टक्के लाभांश- श्री वसंत कवाद
शहरातील नावलौकिक असलेल्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी अमोल गर्जे यांची बिनविरोध निवड

अहमदनगर, ता.२७ : शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात लोककल्याणकारी राज्याची कल्पना मांडली आणि ती अस्तित्वात येण्यासाठी आजन्म प्रयत्न केले. त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचा पाया घातला, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य तुकाराम पाटील यांनी व्यक्त केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बोलत होते.
न्यु आर्टस महाविद्यालयात राजर्षी शाहु महाराज जयंती निमीत्त श्री. पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे होते. यावेळी उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव ॲड. विश्‍वासराव आठरे, जयेत वाघ, वसंतराव कापरे, प्राचार्य डॉ. बि.एच. झावरे उपस्थीत होते.
या वेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले, पूर्वी कोरोना सारखी प्लेगची साथ आली तेव्हा राजर्षी शाहूं महाराजांनी ज्या पद्धतीने आपल्या प्रजेचे प्राण वाचवले. ती उपाययोजना आज एवढ्या प्रगत अवस्थेत असताना आपण करू शकत नाही. सर्वात पहिली रोजगार हमी योजना राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली होती, संकट काळात राज्यकर्त्यांनी कसे वागावे हा आदर्श राजर्षी शाहू महाराजांकडून घ्यावा.
 शिक्षण, विद्यार्थी वसतिगृह, अस्पृश्यता निवारण, शेती-शेतकरी विकास, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, अल्पसंख्याक समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केले. त्या काळात आरक्षण कायदा केला, आंतरजातीय विवाह कायदा केला, विधवा पुनर्विवाह कायदा केला. या सर्व बाबतीत त्यांनी केलेल्या कामाला आपण आजही समाधानकारक रित्या पुढे नेऊ शकलो नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आजच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शाहूं महाराजाचा पुरोगामीत्वाचा वारसा अत्यंत महत्वाचा आहे दलित समाजाचे स्वतः नेतृत्व न करता ‘आता डॉ बाबासाहेब आंबेडकर तुमचे नेतृत्व करतील’ अशी घोषणा करून त्यांना खंबीरपणे साथ देणारा लोकोत्तर राजा पुन्हा होणे नाही असेही ते म्हणाले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमार झावरे पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष हा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या बलिदानातुन प्रेरणा घेऊन व राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्शावर शंभरवर्षं सुरू आहे. व बहुजन, आदिवासी वंचित घटकातील मुले मुली आज शिक्षण घेत आहेत. आम्ही हा विचार घेऊन पुढे ही चालत राहू अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी विचारपिठावर संस्थेचे उपाध्यक्ष मा. रामचंद्र दरे, सचिव मा. जी. डी. खानदेशे, सहसचिव अँड. विश्वासराव आठरे पाटील, विश्वस्त मा. जयंत वाघ, कार्यकारिणी सदस्य मा. अँड. वसंतराव कापरे, रेशिडेशिअल हायस्कुल चे प्राचार्य विजय पोकळे, संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक  शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मा. जी. डी. खानदेशे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ भास्करराव झावरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नवनाथ येठेकर यांनी केले.

COMMENTS