Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजारामबापू कारखाना निवडणूक बिनविरोध; संचालक मंडळात 14 नवे चेहरे

राजरामनगर : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना नूतन संचालकांसमवेत पी. आर. पाटील, शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील

वाळवा-शिराळा विधानसभा मतदारसंघ विधान परिषदेपासून वंचित
रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांसमवेतच्या आढावा बैठकीत रूसा अंतर्गत २६.५१ कोटी अनुदानाचे वाटप
वारकर्‍यांच्या सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभाग सज्ज

इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्याचे माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राज्यात चौफेर घोडदौड करणार्‍या राजारामनगर (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. आ. जयंत पाटील यांच्यासह सत्ताधारी गटाच्या 17 उमेदवारांनी आज (सोमवार) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. युवा नेते प्रतिक जयंत पाटील यांच्यासह नव्या 14 चेहर्‍यांची संचालक मंडळात एंट्री झाली आहे. नूतन संचालकांनी प्रमुख पदाधिकारी व समर्थकांच्यासह लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी नूतन संचालकांचे अभिनंदन करून पुढील कामास शुभेच्छा दिल्या.
बिनविरोध निवड झालेले गटवार संचालक मंडळ-इस्लामपूर गट क्रं. 1 प्रताप शामराव पाटील तांदूळवाडी, शैलेश शामराव पाटील इस्लामपूर, बोरगाव गट क्रं. 2 विजयराव बळवंत पाटील साखराळे, विठ्ठल भगवान पाटील बहे, कार्तिक मानसिंगराव पाटील बोरगाव, आष्टा गट क्रं. 3 प्रदीपकुमार विश्‍वासराव पाटील शिगाव, रघुनाथ पांडुरंग जाधव आष्टा, बबन जिनदत्त थोटे आष्टा, कुरळप गट क्रं. 4, रामराव ज्ञानदेव पाटील कार्वे, दीपक पांडुरंग पाटील कुरळप, अमरसिंह शिवाजीराव साळुंखे करंजवडे, पेठ गट क्रं. 5 प्रतिक जयंत पाटील कासेगाव, अतुल सुधाकर पाटील पेठ, कुंडल गट क्रं. 6 सतीश उर्फ दादासाहेब यशवंत मोरे रेठरेहरणाक्ष, प्रकाश रामचंद्र पवार कुंडल, ब वर्ग संस्था गट : देवराज जनार्दन पाटील, कासेगाव, अनुसूचित जाती : राजकुमार वसंत कांबळे इस्लामपूर, महिला राखीव : सौ. मेघा मधुकर पाटील शिगाव, डॉ. सौ. योजना सचिन शिंदे कणेगांव, भटक्या विमुक्त जाती-जमाती-आप्पासो विष्णू हाके कारंदवाडी, इतर मागासवर्गीय : हणमंत शंकर माळी इस्लामपूर हे होत.
निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी जबाबदारी पाहिली. सहाय्यक उपनिबंधक रंजना बारहाते, बी. डी. मोहिते, सहाय्यक सोमनाथ साळवी यांनी त्यांना सहकार्य केले.
अतुल पाटील पेठ, दीपक पाटील कुरळप, शैलेश पाटील इस्लामपूर, अमरसिंह साळुंखे करंजवडे, बबनराव थोटे आष्टा, ज्येष्ठ नेते रघुनाथ जाधव आष्टा, आप्पासो उर्फ रमेश हाके कारंदवाडी, डॉ. योजना पाटील इस्लामपूर, प्रताप पाटील तांदूळवाडी, रामराव पाटील कार्वे, राजकुमार कांबळे इस्लामपूर, हणमंत माळी इस्लामपूर या नव्या चेहर्‍यांना संचालक मंडळात संधी देण्यात आली आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी सन 1968 मध्ये स्थापन केलेल्या साखर कारखान्याने वाळवा तालुका व परिसराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. कारखान्याची चार युनिट असून यातील दोन युनिटमध्ये सविज निर्मिती केली जाते. राज्यातील एक आदर्श कारखाना म्हणून ओळख आहे. कारखान्याचे 12 हजार 500 सभासद आहेत. कारखान्याच्या 6 गटातून 21 संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल ऊस उत्पादक सभासद व प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील, संजय पाटील यांचे आभार मानले.

COMMENTS