मुंबई : कोकणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेते दिग्गज नेते राजन साळवी यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर साळवी यांनी गुरूवारी शिंदे यां

मुंबई : कोकणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेते दिग्गज नेते राजन साळवी यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर साळवी यांनी गुरूवारी शिंदे यांच्या शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. एकनाथ शिंदे हे आपले राजकीय गुरु असल्याचे राजन साळवी यांनी म्हंटले आहे. ठाणे येथील आनंद आश्रमात राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर यावर आता शिक्कामोर्तब झाले होते. तसेच राजन साळवी हे आज दुपारी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राजन साळवी हे शिवसेनेचे विशेषतः मातोश्रीशी एकनिष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती. मात्र, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि उद्धव ठाकरे यांनी देखील विनायक राऊत यांचीच बाजू उचलून धरल्याने राजन साळवी यांचे मन दुखावले होते. यामुळेच त्यांनी आता ठाकरे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.
COMMENTS