Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज ठाकरेंचे “शहाणपण”!

खरं तर महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्याच वळ्णावर जात असतांना ठाकरे कुटुंब लोकशाहीवादी भूमिका घेत आपले पुरोगामित्व सिद्ध करतांना दिसून येत आहे. ख

एअर इंडियाची ‘घर वापसी’ ?
फसवणुकीचा नवा अवतार !
भारत-कॅनडा संबंधात वितुष्ट

खरं तर महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्याच वळ्णावर जात असतांना ठाकरे कुटुंब लोकशाहीवादी भूमिका घेत आपले पुरोगामित्व सिद्ध करतांना दिसून येत आहे. खरंतर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या प्रदूषणावर जोरदार भाष्य केले होते, त्यांचा रोख महाकुंभवर टीका करणे हा नव्हता, तर गंगा नदी किती अस्वच्छ झाली आहे, यावर त्यांनी भाष्य केले होते. तसेच जर तुम्ही तुमचे पापे धुवायला जर तिथे जात असाल तर, पापे करताच कशाला असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. तीच भूमिका त्यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पुन्हा एकदा अधोरेखित केली. त्याचबरोबर त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे यांचे शहाणपण सिद्ध होतांना दिसून येत आहे.
राजकारणात राज ठाकरे यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही, ज्याप्रमाणे महाविकास आघाडी राज ठाकरे यांना जवळ करू शकली नाही, तशीच महायुती देखील राज ठाकरे यांना जवळ करू शकली नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या नेत्यांची जवळीक वाढत असल्याचे अनेकवेळेस त्यांच्या भेटीगाठीतून दिसून आले, मात्र महायुतीत जाण्यापेक्षा स्वबळावर लढणे राज ठाकरे यांनी मान्य केले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांची वैचारिक भूमिका बदलतांना दिसून येत आहे. एकेकाळी कट्टर हिदुंत्ववादी चेहरा असणारे राज ठाकरे काहीसे पुरोगामीच्या मार्गावर चालतांना दिसून येत आहे. खरंतर राज ठाकरे यांची राजकीय भूमिका वेगळी असू शकते, स्वतंत्र बाण्याची असू शकते, त्याबद्दल दुमत नाही, मात्र राज ठाकरे आपली वैचारिक भूमिका बदलतांना दिसून येत आहे, त्यातून ते प्रगल्भ विचारांकडे झुकतांना दिसून येत आहे. मुळातचः राजकारण हा काही फावल्या वेळेत करायचा उद्योग नाही, तर तो पूर्णवेळ करण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे राज ठाकरेंना पूर्णवेळ कधीही राजकारण करता आले नाही, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांना त्यांना कधीही राजकीय कार्यक्रम देता आला नाही. तसेच त्यांच्या भूमिका ठाम नसल्यामुळे या पक्षाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र तरीही राजकारणात राज ठाकरे यांच्या नावाचा दबदबा कायम जाणवतो. वास्तविक पाहता लोकसभा अणि विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने साखरपेरणी राजकीय पक्षांकडून पार पडतांना दिसून येत आहे. मात्र राजकीय भूमिका घेत असतांना वैचारिक भूमिका ठाम घेणे अनेकदा राजकीय पक्षांना अवघड होवून जाते. महायुतीतील पक्षांकडून औरंगजेबाच्या कबरीला कडाडून विरोध होतांना दिसून येत आहे, अशावेळी कबरीचे समर्थन करणे, कबर तिथेच ठेवण्याचे आव्हान करणे, याउलट विद्यार्थ्यांच्या सहली काढा, त्यांना औरंगजेब समजावून सांगा ही भूमिका शहाणपणाची ठरते, आणि आजच्या राजकीय वातावरणात इतक्या प्रखरपणे ती भूमिका मांडणे ही अतिशय महत्वाची बाब आहे, आणि तीच राज ठाकरे यांनी मांडली. राज्यात एकीकडे मराठा-ओबीसी, दुसरीकडे मराठा-धनगर यावरून नवे वादंग उभे राहतांना दिसून येत आहे. त्यातच रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्याची मागणी होतांना दिसून येत आहे, या सर्व बाबी बघता महाराष्ट्राला अधोगतीच्या दिशेने घेवून जाण्याची काही प्रवृत्तींनी ठरवल्याचे दिसून येत आहे, अशावेळी एक ठाम भूमिका घेत महाराष्ट्राला एका वैचारिक उंचीवर नेत कबरीचा मुद्दा आजमितीस गौण आहे, तो आजचा प्रश्‍न नाहीच आहे, आज राज्याच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्याची गरज आहे, बेरोजगारी कमी होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलण्याची खरी गरज आहे, त्यादृष्टीने त्यावर भाष्य करण्याची आज खरी गरज आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका महाराष्ट्राला पटतांना दिसून येत आहे. केवळ आपला मतदार शाबूत राहावा, यासाठी कडव्या हिंदुत्ववादाची भूमिका घेवून काही माथी भडकाविणे हे आजचे राजकारण असू शकत नाही, किंबहूना ती आजची गरज नसल्याचेचच राज ठकरे यांच्या भाषणाने सिद्ध केले आहे.

COMMENTS