राज ठाकरें’ची ससेहोलपट !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज ठाकरें’ची ससेहोलपट !

महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित परंतु तितकेच अपयशी  ठरलेले नेतृत्व म्हणजे राज ठाकरे. परंतु, तरीही, युवकांचे आशास्थान असणारे राज ठाकरे हे जेव्हा

काँग्रेसचे ’हाथ से हाथ जोडो’ अभियान
कोलकात्यातील डॉक्टरांचा संप 41 दिवसांनी मागे
नगर शहरात मुसळधार पावसाची हजेरी… गाड्या गेल्या पाण्याखाली… रस्त्याला नदीचे स्वरूप (Video)

महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित परंतु तितकेच अपयशी  ठरलेले नेतृत्व म्हणजे राज ठाकरे. परंतु, तरीही, युवकांचे आशास्थान असणारे राज ठाकरे हे जेव्हाही सभा घेतात, त्या सभेला  उस्फुर्त युवकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असायची; परंतु, काल गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या मेळाव्यात उपस्थित असलेला जनसमुदाय हा खास करून इव्हेंट मॅनेजमेंट  पद्धतीने  गोळा केलेला दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, लोकांना पैसे देऊन ही गर्दी आणली गेली. राज ठाकरे यांची ही पहिली सभा राहिली की ज्यामध्ये त्यांनी आपल्या स्वभाव वैशिष्ट्ये नुसार न बोलता कोणीतरी बोलविता धनी त्यांना बोलायला भाग पाडतो आहे, असे त्यांच्या भाषणावरून तरी स्पष्ट झालेले दिसते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेतीलच तरुण जे मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करत होते, त्यांनी त्यांच्यासोबत शिवसेना सोडून राज ठाकरेंची सोबत केली. रुबाबदार व्यक्तिमत्व आक्रमक शब्द शैली आणि विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे अनुकरण करणारे त्यांचे शब्द हे तरुणांना आकर्षित करणारे राहिलेत. परंतु, सुरवातीच्या काळात त्यांनी या बळावर राजकारणात काही प्रमाणात यशही मिळवले. मात्र, २०१७ नंतर त्यांचा पक्ष सातत्याने संकुचित होत असताना दिसतो आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे यांच्या भाषणातून भाजपा वर प्रचंड टीका निघत होती आणि त्यांची ती भाषणे महाराष्ट्रात गाजत होती. ‘लाव रे तो व्हिडिओ’ या मालिकेतील त्यांच्या भाषणावर त्यावेळी भाजपने सडकून टीकाही केली होती. परंतु कालचे त्यांचे भाषण झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून त्यावर सडकून टीका होत असताना, भाजपने मात्र त्यांच्या भाषणाची केलेली स्तुती, ही बाबच ‘अंदर की बात’ म्हणून लोकांच्या मनावर बिंबली असल्याचे जाणवायला लागले आहे. कधी परप्रांतीयांचा मुद्दा तर कधी मराठी भाषेचा मुद्दा असे अधून मधून मुद्दे घेत राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांना आता राजकारणाचा खरा सुरू गवसलाच नाही, असे म्हणावे लागेल. बहुदा त्यांच्या सभेला येणारी तरुण हे प्रचंड घोषणाबाजी करत असतात त्यामुळे सभा सुरू होण्या आधीच त्यांच्या सभेच्या विषयी तरुणांच्या घोषणाबाजी इथूनच सभेचा उत्साह किती प्रचंड आहे हे स्पष्ट होत असे. परंतु काल सभेच्या ठिकाणी ज्या गाड्यांमधून तरुण उतरत होते त्यातील तरुण घोषणा देण्यापासून मात्र वंचित राहिलेले होते याचा अर्थ उस्फुर्त घोषणा काय आहेत याची तयारी ही त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट करून घेऊ शकली नाही, हे देखील जाणवल्याशिवाय राहिले नाही. खरे सांगायचे झाले तर महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी सज्ज झालेल्या राज ठाकरेंची खरेतर राजकारणात आता ससेहोलपट सुरू आहे त्यांच्या या राजकीय होरपळीचा काहीसा गैरफायदा उचलावा, असे महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणारे भाजपाने ठरवलेले दिसते. त्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यामध्ये जी काही अंदर की बात झालेली आहे, ती आता लोकांच्या चर्चेतून उघड होऊ लागली आहे. या सभेमध्ये राज ठाकरेंना कोणतेही मुद्दे व्यवस्थित मांडता आले नाहीत. एका मुद्द्याची बाब दुसऱ्या मुद्द्याशी तर्कसंगत पद्धतीने जुळलेली नाही. एका बाजूला उत्तर प्रदेशातील योगी सरकार आले याचे स्वागत करायचे आणि दुसऱ्या बाजूला समूहाला विचारायचे की तुम्हाला इथे उत्तरप्रदेश सारखी स्थिती महाराष्ट्रात करायची आहे काय हा जो त्यांच्या भाषणातील विरोधाभास होता हा विरोधाभास त्यांचा आत्मविश्वासच गमावलेला असल्याचे सिद्ध करून गेला आहे. मनसे वर किंबहुना राज ठाकरे हे हिंदुत्ववादी नेते म्हणून उदयास आलेले असले तरी आज पर्यंत त्यांचा मेळावा हा इतर महोत्सव प्रसंगी होत असेल साधारणता दसऱ्याच्या निमित्ताने परंतु प्रथमच त्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मेळावा घेऊन एक प्रकारे ब्राह्मणी संस्कृतीच्या आक्रमणावर शिक्कामोर्तब केले आहे. 

COMMENTS