Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

मुंबई प्रतिनिधी - राज ठाकरे दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेणार आहेत. या भेटीत विविध प्रश्नावर चर्चा

मनसेचा तिसरा उमेदवारही जाहीर
सगळ्या निवडणूक प्रक्रियेची थट्टा करून टाकली आहे… राज ठाकरेंचा घणाघात
भाजप हा पक्ष मी चालवत नाही ; राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी – राज ठाकरे दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेणार आहेत. या भेटीत विविध प्रश्नावर चर्चा होणार असून त्यात प्रामुख्याने टोलविषयी चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत ते राज ठाकरेंना काय आश्वासन देतात हे पाहणे गरजेचे आहे. कारण राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला होता. टोलबाबत सरकारची भूमिका काय यावर आजच्या बैठकीत चर्चा होईल. त्यातील माहिती राज ठाकरे स्वत: माध्यमांना देतील. जर यात सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलले नाहीतर राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर उभे राहतील आणि वाहने सोडतील, जिथे वाहने सोडली जाणार नाहीत तिथे टोलनाके जाळू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

COMMENTS