Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आधी हिंदी लादणार्‍यांचे कान उपटा, मग आम्हाला शिकवा!

भाषिक अस्मितेला ‘आजार’ म्हणणार्‍या सरसंघचालकांना राज ठाकरेंनी सुनावलेमुंबई : भाषेच्या आधारे होणार्‍या संघर्षांना स्थानिक आजार असे संबोधणार्‍या राष

जात आधी मनातून गेली पाहिजे : सरसंघचालक भागवत
चारित्र्यसंपन्न समाज निर्माण व्हावा ः सरसंघचालक भागवत
संघाची समरस चालाखी!

भाषिक अस्मितेला ‘आजार’ म्हणणार्‍या सरसंघचालकांना राज ठाकरेंनी सुनावले
मुंबई : भाषेच्या आधारे होणार्‍या संघर्षांना स्थानिक आजार असे संबोधणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर केलेल्या सडेतोड पोस्टमधून त्यांनी भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचे समर्थन करत, मराठी अस्मिता अबाधित राहणारच, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
मुंबईत पार पडलेल्या संघाच्या दोन दिवसीय व्याख्यानमालेत बोलताना मोहन भागवत यांनी भाषिक आग्रह आणि त्यातून होणार्‍या आंदोलनांवर टीका केली होती. महाराष्ट्रातील मराठी-अमराठी वादाचा उल्लेख करत त्यांनी अशा प्रकारच्या संघर्षांना आजार अशी उपमा दिली. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी थेट प्रत्युत्तर देत, आम्हाला काय करायचं ते आम्ही ठरवू. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम आणि सर्वोच्च प्राधान्य आहे, असे ठामपणे सांगितले. राज ठाकरे म्हणाले की, समाजात भाषेच्या नावावर सतत संघर्ष सुरू असतो, असा समज चुकीचा आहे. व्यवहार, नाती, मैत्री हे सर्व सुरूच असते. मात्र काही घटकांकडून जाणीवपूर्वक स्थानिक संस्कृती आणि भाषेचा अवमान केला गेला, की त्यातून असंतोष उफाळतो. याला आजार म्हणायचं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाषावार प्रांतरचनेचा इतिहास भागवतांना माहीत असायलाच हवा, असे सांगत राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की भाषेबद्दलचं आणि प्रांताबद्दलचं प्रेम हे देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिण भारतापासून पंजाब, पश्‍चिम बंगाल, गुजरातपर्यंत सर्वत्र तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता दिसून येते. ही भावना समजून घेण्याचा कधी प्रयत्न झाला आहे का? असा थेट प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
परप्रांतीयांचे लोंढे इतर राज्यांत जाऊन स्थानिक भाषा, संस्कृती नाकारतात, तिथे राजकीय आणि सामाजिक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा स्थानिकांचा उद्रेक होतो, असे मत राज ठाकरे यांनी मांडले. जर हे आजार असेल, तर गुजरातमध्ये अशाच घटना घडल्या तेव्हा तिथे समरसतेचे धडे का दिले गेले नाहीत? असा खोचक सवालही त्यांनी केला. मराठी माणसाच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप करत, सत्ताधार्‍यांच्या कमकुवत भूमिकेमुळेच अशी वक्तव्ये करण्याची हिंमत होते, असे त्यांनी नमूद केले. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या भाषेबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा उल्लेख करत त्यांनी अप्रत्यक्ष राजकारणावरही बोट ठेवले. संघाच्या कार्याबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण स्वतःला अराजकीय म्हणवून घेणार्‍या संघाने अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेऊ नये, असे सांगत राज ठाकरे यांनी हिंदी लादणीच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका केली. हिंदी ही राष्ट्रभाषा नसताना तिची सक्ती होत असेल, तर त्यावर आधी भूमिका घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

हिंदूत्वाच्या मुद्दयांवर संघाची दुटप्पी भूमिका
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की हिंदूंवर अन्याय झाला तर मनसे नेहमीच पुढे उभी राहील. मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या दुटप्पी भूमिकांवर आणि राजकीय तमाशावर संघाने कधी ठामपणे बोलावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS