Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव मोठे करा

आ. सत्यजीत तांबे यांचा हँडबॉल खेळाडूंना संदेश

अहमदनगर/प्रतिनिधी ः कोणताही खेळ मनापासूनच खेळा. त्या खेळाच्या माध्यमातून तुमचे आणि देशाचे नाव मोठे करा, असा संदेश आमदार सत्यजीत तांबे यांनी खेळाड

जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्‍वास ठेवायचा की नाही?
तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल !
बंद कारखान्यांचे भूखंड ताब्यात घेण्याबाबत काय कारवाई केली ?

अहमदनगर/प्रतिनिधी ः कोणताही खेळ मनापासूनच खेळा. त्या खेळाच्या माध्यमातून तुमचे आणि देशाचे नाव मोठे करा, असा संदेश आमदार सत्यजीत तांबे यांनी खेळाडूंना दिला. संगमनेरच्या मातोश्री रु.दा. मालपाणी विद्यापीठात झालेल्या 54 व्या वरिष्ठ पुरुष हँडबॉल निवड चाचणी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्हा हौशी हँडबॉल असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर आमदार तांबे बोलत होते.
यावेळी बोलतांना तांबे म्हणाले की, आजची तरुण पिढी केवळ एक-दोन खेळांपुरतीच मर्यादीत राहिलेली नाही. तुम्ही अनेक खेळ खेळता. मी जसा तुम्हाला प्रेरणा देत असतो, तसेच मलाही तुमच्याकडून प्रेरणा मिळते. कोणताही खेळ खेळताना तो खूप मन लावून खेळा. तसेच त्या खेळात अशी उंची गाठा की, तुमचे आणि देशाचे नाव मोठे होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. खेळ आणि आरोग्य याबाबतही त्यांनी भाष्य केले. धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. पण रोज एखादा मैदानी खेळ खेळत असाल, तर आरोग्याच्या दृष्टीनेही ते हिताचे आहे, असे आ. तांबे म्हणाले. निवड चाचणीदरम्यान कोणाची निवड होईल, तर कोणाला निवडले जाणार नाही. पण सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. निवड झाली नाही, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. खडतर परिस्थितीत हार न मानता सतत प्रयत्न करत राहणे, हेच खेळ आपल्याला शिकवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी खेळाडूंचे विविध प्रश्‍न आणि समस्या जाणून घेत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

COMMENTS